आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक संघटना किती दिवस बेजबाबदार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समर आणि विंटर ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ काळापासून भारताची कामगिरी निराशाजनकच ठरली आहे. मला इतिहास उकरून काढायचा नाही. मात्र, ऑलिम्पिकच्या निमित्ताने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कारनाम्यांकडे लक्ष वेधायचे आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना सध्या निलंबित आहे. बहुदा त्यांना आपल्या जबाबदारीची थोडीशीसुद्धा काळजी नाही. रशियाच्या सोचीमध्ये विंटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे. यात शिवा केसवनसह तीन भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. या खेळाडूंना भारतीय तिरंग्याऐवजी आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या झेंड्याखाली स्पर्धेत सहभागी व्हावे लागत आहे.
या खेळाडूंनी पदक जिंकले, तर भारताचे राष्ट्रगीतसुद्धा वाजणार नाही. या खेळाडूंची स्थिती अनाथासारखी झाली आहे. हे सत्यच आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून आपल्या देशासाठी राष्‍ट्रीय गौरव मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. दुर्दैव की, आपल्या ऑलिम्पिक संघटनेला (आयओसी) याची मुळीच काळजी नाही. एक वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनसुद्धा अद्याप भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
मला सेऊल ऑलिम्पिकची (1988) एक घटना आठवत आहे. त्या वेळी 400 मी. हर्डल शर्यतीत पराभवानंतर अमेरिकेचा धावपटू एडविन मोजेसची प्रतिक्रिया लक्षवेधी होती. तो म्हणाला, ‘मला धावणे आणि जिंकणे निश्चितपणे खूप आवडते. मात्र, मी हे सर्व काही अमेरिकेच्या राष्टÑध्वजासह करू इच्छितो.’ 30 वर्षीय मोजेस एका युवा खेळाडूकडून हरला होता. मात्र, देशाबद्दल त्याचा सन्मान, प्रेम आणि समर्पण प्रशंसनीय असेच होते. देश सर्वात उंच आणि पुढे असल्याचा हा संदेश सर्वच खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. एखाद्या खेळाडूच्या व्यक्तिगत कामगिरीत देशाचे नाव जोडले, तर त्या इतका मोठा आनंद नाही. तशी आशा तर नाही. मात्र, शिवा केसवन किंवा इतर खेळाडूंपैकी एखाद्याने पदक जिंकले, तर त्यांना खरच तितका आनंद होईल का, जितका तिरंग्याखाली खेळताना झाला असता. यात शिवाचा काहीच दोष नाही. तो तर नाइलाजाने आयओसीच्या बॅनरखाली सहभागी होत आहे. मला आणखी एक उदाहरण द्यायचे आहे. 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जेसी ओवंसने धावण्याच्या शर्यतीत आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी हिटलरसमोर जर्मनीचे एकाधिकार मोडले होते. हिटलर ध्यानचंद यांना आपल्या सेनेत घेऊ इच्छित होते. मात्र, ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नकार दिल्याने हिटलर चकित झाला होता. मेजर ध्यानचंद यांच्यासाठी भारतच सर्व काही होते. देशाचे खूप अधिक महत्त्व असते. मात्र, भारतीय ऑलिम्पिक संघटना खोलात जाण्याऐवजी आयओसीच्या सूचनांकडेसुद्धा दुर्लक्ष करत आहे. खेळ आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपले आंतरराष्‍ट्रीय मतभेद विसरून, बाजूला करून एक सकारात्मक संदेश दिला पाहिजे.