आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Lal News In Marathi, Indian Cricket, Divya Marathi

भारताला उणीव ऑलराउंडरची, अरुण लाल यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडिया सध्या मजबूत अष्टपैलू खेळाडूंच्या उणिवेमुळे अडचणीत सापडली आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या वनडे मालिकेत या समस्येमुळे टीम इंडिया अधिक अडचणीत सापडू शकते. भारतीय संघात सध्या रवींद्र जडेजा, स्टुअर्ट िबन्नी आिण आर. अिश्वन अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत आहेत. घरच्या मैदानावर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंसमोर िवदेशात चांगल्या कामगिरीचे आव्हान असेल.

भारतीय िक्रकेट संघाचे माजी खेळाडू अरुण लाल यांच्या मते, एकवेळ टीम इंिडयात कपिलदेव, आिबद अली, रवी शास्त्री, मनोज प्रभाकर, कीर्ती आझाद, मदन लाल आिण स्वत: अरुण लाल अष्टपैलू खेळाडूंची भूमिका पार पाडत होते. सध्या भारतीय संघाकडे खऱ्या अर्थाने अॉलराउंडरची कमी आहे. अिश्वनचे लक्ष फलंदाजीत अिधक आहे, तर दुसरीकडे जडेजा गोलंदाजीत चांगला यशस्वी ठरतो आहे. हे दोघेही अष्टपैलू खेळाडूंची भूमिका समर्थपणे पेलत नसल्याचे अरुण लाल यांना वाटते. जडेजा फलंदाजीत कमी पडत असल्याचे अरुण लाल यांनी म्हटले.

िबन्नी, भुवनेश्वरमध्ये क्षमता
अरुण लाल यांच्या मते, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारमध्ये अष्टपैलू खेळाडू बनण्याची चांगली क्षमता आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सलग अर्धशतक ठोकण्याचा िवक्रम केला आहे. त्याच्याकडे चांगला अष्टपैलू खेळाडू बनण्याचे गुण आहेत. हे गुण िवकसित होत आहेत. तर बिन्नी त्याच्या वडिलांप्रमाणे चांगला अष्टपैलू बनू शकतो.

अिश्वन, जडेजा अष्टपैलू म्हणून ठरलेत अपयशी
अिश्वनचा उपयोग बहुतेक वेळा मुख्य ऑफस्पिनर म्हणून होतो, तर रवींद्र जडेजासुद्धा गोलंदाजीवर अिधक मेहनत घेत आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मािलकेत अिश्वनला फक्त दोन सामन्यांत खेळण्याची संधी िमळाली. अिश्वन फलंदाजीत आठव्या क्रमांकावर, तर जडेजाला सातव्या क्रमांकावर खेळण्याची संधी िमळते. या क्रमांकावर त्यांना धावा काढण्याची खूप अिधक संधी िमळत नाही.

प्रमुख खेळाडूंची कामगिरी
* सुरेश रैना : १९२ सामने, ४६६३ धावा, ३ शतके, २९ अर्धशतके, २६ िवकेट.
* रवींद्र जडेजा : १०१ सामने, १५४१ धावा, ९ अर्धशतके, १२० िवकेट.
* भुवनेश्वर कुमार : ३५ सामने, १३५ धावा, ३७ िवकेट.
* स्टुअर्ट िबन्नी : ४ सामने, २८ धावा, ६ िवकेट.

स्टुअर्ट िबन्नी योग्य पर्याय
स्टुअर्ट िबन्नीने गोलंदाजीत प्रभाव पाडला तर तो योग्यपणे अष्टपैलूची भूमिका पार पाडू शकतो. त्याची फलंदाजी चांगली आहे. गोलंदाजीत सुधारणेची गरज आहे. - सौरव गांगुली, माजी कर्णधार.