आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • As wickets tumble down under cricketers brand value crumbles

महेंद्र सिंह धोनीची बाजारातील किंमतही झाली कमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियात अतिशय लाजिरवाणी खेळी केल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची बाजारातील किंमत कमी झाली आहे. यामुळे त्याच्या उत्पन्नात आता २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
टीम इंडियाच्या क्रिकेट खेळाडूंची बाजारातील किंमत (ब्रॅंड व्हॅल्यू) ही प्रतिष्ठेची बाब असते. क्रिकेट खेळाडूंना डोक्यावर बसवून घेणा-या जनतेत असलेल्या नाराजीचा परिणाम खेळाडूंच्या किंमतीवर होऊ घातला आहे. ब्रॅंड एक्सपर्ट, मीडिया विश्लेषक आणि स्पोर्ट्स मार्केटिंग एजन्सी या सर्वांनी मिळून भारतीय खेळाडूंच्या ब्रॅंड व्हॅल्यूत २० टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ३-० ने पराभव झाल्यामुळे आता भारतीय खेळाडूंना जाहिरातीतून मिळणा-या पैशात २० टक्क्यांनी कपात होईल. याचा सर्वाधिक फटका धोनीला बसणार आहे. कसोटी खेळातून निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे धोनीशी संबंधित ब्रॅंड आता नव्याने त्याची 'किंमत' ठरवतील असे दिसते.
फ्युचरब्रॅंड्सचे सीईओ संतोष देसाई म्हणाले की, पराभवाचा धोनी आणि अन्य खेळाडूंना जोरदार फटका बसेल. तोशिबासाठी प्रचार व्यवस्थेचे काम पाहणारी एजन्सी जेनिथऑप्टीमीडियाचे व्हाईस प्रेसिडेंट नवीन खेमका यांनी सांगितले की, 'खेळाडूंविषयी कंपन्या नव्याने विचार करीत आहेत.' सचिन हा तोशिबासाठी जाहिरात करतो हे उल्लेखनीय.
तिरंगी मालिकेसाठी सचिनचा वनडे संघात समावेश
तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 37 धावांनी विजय
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी