Home | Sports | Other Sports | asem kureshi, tenis player, ingaement, faha_akmal_makhdoom

पाकचा टेनिसपटू ऐसेम कुरेशी- फहाचा झाला साखरपुडा

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 06:55 AM IST

फ्रेंच ओपनपाठोपाठच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत चमकदार कामगिरी करणारा पाकचा टेनिसपटू ऐसेम कुरेशीचा फहा अकमल मखदुमसोबत लाहोरमध्ये साखरपुडा झाला. येत्या डिसेंबरमध्येही जोडी ‘निकाह’ करणार आहे.

  • asem kureshi, tenis player, ingaement, faha_akmal_makhdoom

    लाहोर: फ्रेंच ओपनपाठोपाठच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत चमकदार कामगिरी करणारा पाकचा टेनिसपटू ऐसेम कुरेशीचा फहा अकमल मखदुमसोबत लाहोरमध्ये साखरपुडा झाला. येत्या डिसेंबरमध्येही जोडी ‘निकाह’ करणार आहे. पाकिस्तानी ब्रिटिश कुटुंबीयातील असलेली फहा मखदुम ही एक्सेस विद्यापीठातून मानसशास्त्रामध्ये बी.एस्सी. (आॅनर्स) शिक्षण पूर्ण करत आहे. फहाची निवड कुरेशीच्या कुटुंबीयांनी केली. वर्षभरापासून कुरेशीची कामगिरी अधिकच उंचावत आहे. दुहेरीत शानदार आघाडीची खेळी करणाºया कुरेशीला रोहन बोपन्नाने महत्त्वपूर्ण साथ दिली. याच साखरपुड्याच्या कार्यक्रमाला टेनिस विश्वातल्या अनेकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला होता. या साखरपुड्यामुळेच आपण अधिकच खुश असल्याची प्रतिक्रिया कुरेशीने दिली. तर मला डिसेंबर महिन्याची उत्सुकता लागल्याची कबुली फहाने या वेळी दिली. डिसेंबरमध्ये मोठ्या धामधुमीत ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Trending