आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashes 2013: Stuart Broad Helps England To New Ashes Heights

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडची हॅट्ट्रिक, तिसर्‍यांदा जिंकली अँशेस मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेस्टर ली स्ट्रीट - यजमान इंग्लंडने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना सोमवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अँशेस मालिका विजयाची हॅट्ट्रिक केली. यजमानांनी चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशीच 74 धावांनी ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळवला. यापूर्वी इंग्लंडने 2009 आणि 2010-11 मध्येही अँशेस मालिका जिंकली होती. विजयाचा शिल्पकार स्टुअर्ट ब्रॉडने सुरेख गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 224 धावांवर रोखले. त्याने 50 धावा देत शानदार 6 विकेट घेतल्या. तसेच टीम ब्रेसनन व स्वानने प्रत्येकी दोन गडी बाद केले. विजयासह इंग्लंडने मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली. इंग्लंड संघाने दुसर्‍या डावात 330 धावांची खेळी केली. अशा प्रकारे पहिल्या डावात 32 धावांची आघाडी घेणार्‍या ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 299 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात कांगारूंना 224 धावांपर्यंत मजल मारता आली. वॉर्नर (71), रोर्जस (49), सिडल (23) वगळता इतर फलंदाज स्वस्तात बाद झाले.

तत्पूर्वी इंग्लंडने सोमवारी 5 बाद 234 धावांवरून चौथ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. हॅरिसने इयान बेल (113) व मॅट प्रायरला बाद केले. ब्रॉड 13 व ब्रेसनन 45 धावांवर बाद झाले. स्वानने नाबाद 30 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : पहिला डाव-238, दुसरा डाव : 330, ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 270, दुसरा डाव : सर्वबाद 224