आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस: पीटरसनने इंग्लंडला सावरले; तिसरा दिवसअखेर इंग्लंड 7/294

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर- अ‍ॅशेस मालिकेच्या तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केविन पीटरसनचे झुंजार शतक (113) व इयान बेल (60) यांच्या शानदार खेळीने इंग्लंडचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या 527 धावांचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने 7 बाद 294 धावा काढल्या. इंग्लंडला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 34 धावांची गरज असून त्याच्या 3 विकेट शिल्लक आहेत. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अद्याप 233 धावांची मागे आहे.

कुक (62) बाद झाल्यानंतर इंग्लंडचा संघ 4 बाद 110 धावा असा संकटात सापडला होता. यानंतर पीटरसन आणि बेल यांनी 115 धावांची भागीदारी केली. पीटरसनने जबरदस्त फलंदाजी करताना 206 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 12 चौकारांसह 113 धावा ठोकल्या. बेलने 112 चेंडूंत 60 धावांची खेळी केली. बेलने आपल्या खेळीत 10 चौकार आणि एक षटकार मारला. चहापानाच्या ब्रेकनंतर हॅरिसने बेलचा त्रिफळा उडवून ही भागीदारी मोडली. यानंतर आलेल्या बेयरस्ट्रोने 22 धावांचे योगदान दिले. पीटरसन आणि बेयरस्ट्रो या दोघांना स्टार्कने पॅव्हेलियनमध्ये परतवले.
कांगारूंकडून स्टार्कने 3, तर हॅरिस, सिडलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 7 बाद 527 धावा (डाव घोषित), इंग्लंड : पहिला डाव : 7 बाद 294 (अ‍ॅलेस्टर कुक 62, केविन पीटरसन 113, इयान बेल 60, 3/75 मिशेल स्टार्क, 2/53 पीटर सिडल, 2/50 रेयान हॅरिस.)

केविन पीटरसनचे 23 वे शतक
इंग्लंडचा मधल्या फळीचा फलंदाज केविन पीटरसनने संघ संकटात सापडला असताना दमदार फलंदाजी करून शतक ठोकले. पीटरसन 113 धावा काढून बाद झाला. कसोटीतील हे त्याचे 23 शतक ठरले. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचे हे पहिलेच शतक ठरले आहे.