आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅशेस मालिका: ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅडिलेड - विजयासाठी 530 धावांचा डोंगर पार करण्याचे आव्हान ठेवत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला अ‍ॅशेस मालिकेच्या दुस-या कसोटी सामन्यात पराभवाच्या कैचीत अडकवले आहे. चौथ्या दिवसखेर इंग्लंडची 6 बाद 247 अशी अवस्था झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या विजयाची मोठी संधी आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला पराभवाच्या गर्तेत टाकले आहे.
दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ खेळाची औपचारिकता पूर्ण करत 3 बाद 132 धावा काढून इंग्लंडसमोर विजयासाठी 530 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात पराभव वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची अवस्था दयनीय झाली असून चौथ्या दिवसअखेर त्यांनी 6 बाद 247 धावा काढल्या आहेत. कसोटीचा शेवटचा दिवस अद्याप बाकी असून इंग्लंडला 284 धावा काढायच्या आहेत.
दुस-या डावात इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अ‍ॅलेस्टर कुक केवळ 1 धाव काढून बाद झाल्यानंतर जो. रूट (87) आणि केविन पीटरसन (53) यांनी अर्धशतके काढली. सिडलने पीटरसनचा काटा काढला. त्यानंतर रूटला लॉयनने हॅडिनकरवी झेल बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव 570/9 घोषित, इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद 172, ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव 132/3 घोषित, इंग्लंड : दुसरा डाव 247/6.