आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Series: Bell Make Half Century,England Take Lead

अ‍ॅशेस मालिका: बेलचे नाबाद अर्धशतक; इंग्लंडची आघाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉटिंगहॅम - इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवसअखेर शानदार खेळी करून 261 धावांची आघाडी मिळवली. इयान बेल (95*) व स्टुअर्ट ब्रॉड (47*) यांच्या नाबाद खेळीच्या बळावर इंग्लंडने शुक्रवारी दुस-या डावात 6 बाद 326 धावा काढल्या. बेल व ब्रॉडने सातव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून एश्टन अगरने दोन, पॅटिन्सन आणि सिडलने प्रत्येकी एक गडी बाद केला.


शुक्रवारी 2 बाद 80 धावांवरून कुक व पीटरसनने इंग्लंडच्या तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दरम्यान, कुकने 165 चेंडूंत सहा चौकारांसह शानदार 50 धावा काढल्या. या दोघांनी तिस-या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली. मात्र, पॅटिन्सनने ही जोडी फोडली. त्याने पीटरसनला बाद केले. पीटरसनने 150 चेंडूंत 64 धावा काढल्या. कुकला अगरने बाद केले.


संक्षिप्त धावफलक
इंग्लड दुसरा डाव : 6 बाद 326 धावा. (कुक 50, पीटरसन 64, बेल नाबाद 95, 2/82 अगर).


पाँटिंगचा अलविदा
लंडन २ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने इंग्लिश काउंटी टीम सरेसाठी शेवटच्या सामन्यात नाबाद 169 धावांच्या शानदार खेळीसह प्रथमश्रेणी करिअरमधून निवृत्ती घेतली. 38 वर्षीय पाँटिंगचे हे करिअरमधील 82 वे प्रथमश्रेणीतील शतक ठरले. तो ऑक्टोबरमध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. मॅकग्रा म्हणाला की, पाँटिंग चांगला खेळाडू आहे. त्याच्यासोबत खेळल्याचा वेगळा अनुभव मिळाला.