आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस मालिका: क्लार्कचा इंग्लंडला शतकी खेळीचा दणका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - अ‍ॅशेस मालिकेतील तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने (187) इंग्लंडला दीड शतकी खेळीचा जबर दणका दिला. त्याने 314 चेंडूंत 23 चौकारांसह 187 धावांचे योगदान संघाला दिले. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दुस-या दिवशी शुक्रवारी चहापानापर्यंत 7 बाद 507 धावा काढल्या. यामध्ये स्मिथ (89), हॅडिन (नाबाद 57) आणि स्टार्क (नाबाद 54) यांनी शानदार अर्धशतके झळकावली.


दरम्यान, इंग्लंडच्या स्वानने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी 3 बाद 303 धावांवरून दुस-या दिवशी खेळायला सुरुवात केली. स्मिथने 196 चेंडूंत आठ चौकारांसह 89 धावा काढल्या. मात्र, त्याला स्वानने झेलबाद केले. त्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर (5) झटपट बाद झाला. दरम्यान, ब्रॉडने क्लार्कला त्रिफळाचीत करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर सातव्या क्रमांकावर आलेल्या हॅडिन व स्टार्कने आठव्या विकेटसाठी 77 धावांची अभेद्य भागीदारी केली.