आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Series : Kangaroo Again Backfoot Against England

अ‍ॅशेस मालिका: कांगारूंविरुद्ध इंग्लंड पुन्हा बॅकफूटवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - स्टीव्हन स्मिथ (111) आणि ब्रॅड हॅडिन (55) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने काढलेल्या 385 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ बॅकफूटवर आला आहे. अ‍ॅशेस मालिकेच्या तिस-या कसोटीच्या दुस-या दिवसअखेर इंग्लंडने 4 गडी गमावून 180 धावा केल्या. इंग्लंड पहिल्या डावात 205 धावांनी मागे आहे.
ब्रॉडच्या 3 विकेट
पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. शतकवीर स्टीव्हन स्मिथने आणि मिशेल जॉन्सन यांनी ऑस्ट्रेलियाकडून दुस-या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला. एकूण धावसंख्येत एकही धावेची भर न घालता जॉन्सन 39 धावांवरच ब्रॉडच्या गोलंदाजीवर प्रायरकरवी झेलबाद झाला. त्यानंतर लगेच स्टुअर्ट स्मिथसुद्धा अँडरसनच्या गोलंदाजीवर प्रायरला झेल देऊन तंबूत परतला. तब्बल 208 चेंडूंचा सामना करत त्याने 111 धावा काढल्या. यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
कुकचे अर्धशतक
प्रत्युत्तरात इंग्लंडकडून सलामीवीर अ‍ॅलेस्टर कुक आणि मायकल कार्बेरीने पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. कार्बेरी 43 धावांवर हॅरिसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अ‍ॅलेस्टर कुकने 127 चेंडू खेळून त्याचे अर्धशतक पूर्ण केले. कुकने 72 धावा काढल्या.
पीटरसन पुन्हा फ्लॉप
मालिकेत फारशी प्रभावी कामगिरी करून शकलेला केविन पीटरसन पुन्हा अपयशी ठरला. त्याने फक्त 19 धावांच काढल्या. सिडलने त्याला जॉन्सनकडे झेल देण्यास भाग पाडले. पीटरसनच्या फलंदाजीवर इंग्लंडची मदार आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 385. इंग्लंड पहिला डाव 180/4. (अ‍ॅलेस्टर कुक 72, कार्बेरी 43, 1/26 हॅरिस, 1/27 सिडल.)