आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Series : Stivan Save Kangaroo By Making Century

अ‍ॅशेस मालिका: स्टीव्हनच्या शतकाने कांगारूंना सावरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - दिग्गज फलंदाजांच्या अपयशानंतर मधल्या फळीतील स्टीव्हन स्मिथने (103*) नाबाद शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याचे हे दुसरे कसोटी शतक ठरले. अ‍ॅशेस मालिकेच्या तिस-या कसोटीत पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 6 गडी गमावत 326 धावा केल्या. मिशेल जॉन्सन नाबाद 39 धावांवर खेळत आहे.ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर डेव्हिड वार्नर (60) आणि बी. हॅडिनने 55 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 124 धावांची शतकी भागीदारी केली. निराशाजनक सुरुवात झाल्याने एक वेळ ऑस्ट्रेलिया टीम तीन बाद 143 धावा अशा संकटात सापडली होती.
स्टीव्हन-हॅडिनची शतकी भागीदारी : कांगारूंची बाजू सावरण्यासाठी स्टीव्हन स्मिथ आणि हॅडिनने कंबर कसली. या दोघांनी संयमी खेळी करताना संघाला सुखरूपपणे संकटात बाहेर काढले. या वेळी स्मिथला हॅडिनने महत्त्वपूर्ण साथ दिली. त्याने 191 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 103 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्याच दिवशी 43 चौकार व 5 षटकार ठोकले.
हे फलंदाज ठरले अपयशी
शेन वॉटसन (18), क्रिस रॉजर्स (11), मायकेल क्लार्क (24) आणि जॉर्ज बेली (7) या फलंदाजांना फार काळ मैदानावर आव्हान राखून ठेवता आले नाही. करिअरमधील शतकी कसोटी खेळत असलेला क्लार्क पहिल्या डावात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : 6 बाद 326 धावा (डेव्हिड वार्नर 60, हॅडिन 55, मिशेल जॉन्सन नाबाद 39, स्मिथ नाबाद 103, 2/78 ब्रॉड, 2/71 स्वान).