आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅशेस कसोटी : सामन्याच्या दुस-यादिवशी ऑस्ट्रेलियाची 280 धावांवर मजल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रेंटब्रिज (नॉर्टिंगहॅम) - खेळात ‘खुन्नस’ काय असते याची प्रचिती अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुस-या दिवशी आली. इंग्लंडच्या 215 धावांच्या प्रत्युत्तरात 9 बाद 117 अशा संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियाने 280 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर यजमान इंग्लंडला जवळपास शंभर धावांची आघाडी मिळेल असे वाटत होते. मात्र, या सामन्यात पदार्पण करणारा एश्टन अगर वेगळेच ठरवून आला होता.

अकराव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन अगरने 98 धावा ठोकल्या. अकराव्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून हा सर्वोच्च खेळीचा विश्वविक्रम ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम वेस्ट इंडीजच्या टिनो बेस्टच्या (95) नावे होता. सहाव्या क्रमांकावर आलेल्या फिलिप ह्युजेस (81) सोबत अगरने दहाव्या विकेटसाठी 163 धावांची विक्रमी भागीदारी केली. कांगारूंची टीम सव्वाशे धावासुद्धा काढू शकेल की नाही, असे वाटत असताना ह्युजेस आणि अगरच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 280 धावांपर्यंत मजल मारून पहिल्या डावात 65 धावांची आघाडी घेतली. अगरने सामन्याची सर्व चित्रे फिरवली. अगरच्या फलंदाजीमुळे यजमान इंग्लंडच्या मनसुब्यावरही पाणी फेरले गेले. स्टीव्हन स्मिथनेही अर्धशतक काढताना 53 धावा काढल्या.


इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 85 धावांत 5 विकेट घेतल्या. स्टीव्हन फिनने 80 धावा देत दोन आणि ग्रीम स्वानने 60 धावा देऊन 2 गडी बाद केले.


इंग्लंडची 15 धावांची आघाडी
दुस-या डावात इंग्लंडने दोन बाद 80 धावा काढल्या. यासह इंग्लंडने दुस-या दिवसअखेर 15 धावांची आघाडी मिळवली. या वेळी कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक (37) व पीटरसन (35) हे दोघे खेळत आहेत.


शंभर वर्षे जुना विक्रम मोडला
ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय अगरने (98) पहिल्याच कसोटीत इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक ठोकणारा तो अकराव्या क्रमांकाचा जगातला पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 111 वर्षांचा विक्रम मोडला. त्याने दोन धावा काढल्या असत्या तर पदार्पणाच्या कसोटीत अकराव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला असता. पदार्पणात 11 व्या क्रमांकवर मोठी खेळी करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच आर्मस्ट्राँगच्या नावे होता. त्याने 1902 मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध नाबाद 45 धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत पदार्पण करणारा तो 434 वा खेळाडू ठरला.


धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव धावा चेंडू 4 6
(कालच्या 4 बाद 75 धावांवरून पुढे)
स्मिथ झे. प्रायर गो. अँडरसन 53 79 7 1
ह्युजेस नाबाद 81 131 9 0
हॅडिन झे. त्रि. गो. स्वान 01 2 0 0
सिडल झे. प्रायर गो. अँडरसन 01 5 0 0
स्टार्क झे. प्रायर गो. अँडरसन 00 5 0 0
पॅटिंसन पायचीत गो. स्वान 02 8 0 0
अगर झे. स्वान गो. ब्रॉड 98 101 12 2
अवांतर : 15. एकूण : 64.5 षटकांत सर्वबाद 280. गोलंदाजी : अँडरसन 24-2-85-5, स्टीव्हन फिन 15-0-80-2, ग्रीम स्वान 19-4-60-2, ब्रॉड 6.5-0-40-1.
इंग्लंड दुसरा डाव धावा चेंडू 4 6
अ‍ॅलेस्टर कुक नाबाद 37 130 4 0
ज्यो रुट झे.हॅडिन गो.स्टार्क 5 31 1 0
ट्रॉट पायचीत गो. स्टार्क 0 1 0 0
केविन पीटरसन नाबाद 35 98 6 0
अवांतर : 3. एकूण : 43 षटकांत 2 बाद 80. गोलंदाजी : पॅटिंसन 9-3-27-0, स्टार्क 13-4-15-2, अगर 9-3-29-0, सिडल 9-4-8-0, वॉटसन 3-3-0-0