आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस: स्टीव्हन स्मिथचा शतकी धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने गुरुवारी इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीच्या दुस-या दिवशी पहिला डाव 9 बाद 492 धावांवर घोषित केला. वॉटसनपाठोपाठ (176) स्टीव्हन स्मिथने (138) नाबाद शतक ठोकले. स्मिथने करियरमधील पहिले शतक साजरे करून ऑस्ट्रेलियाला मजबूत धावसंख्या उभी करून दिली. इंग्लंडने पहिल्या डावात दुस-यादिवसअखेर बिनबाद 32 धावा काढल्या. अ‍ॅलेस्टर कुक (17) व रुट (13) हे दोघे खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाने 4 बाद 307 धावांवरून गुरुवारी दुस-या दिवशी खेळायला सुरुवात केली. सिडलला (23) अ‍ॅँडरसनने बाद केले. त्यानंतर हॅडीनने स्मिथला महत्त्वाची साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. हॅडीनने 57 चेंडूंत पाच चौकारांसह 30 धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ जेम्स फाल्कनेरनेही स्मिथसोबत चांगली खेळी केली. मात्र, त्याला वोक्सने झेलबाद केले. फ्यूकनरने 23 व स्टार्कने 13 धावा काढल्या. हॅरीसने 27 चेंडूंत एक चौकार व दोन षटाकरांसह 33 धावा काढल्या. याशिवाय त्याने स्मिथसोबत नवव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. स्मिथने 241 चेंडूंत 16 चौकार व दोन षटकारांसह नाबाद 138 धावा काढल्या. गोलंदाजीत अ‍ॅँडरसन 4, स्वान 2 व ब्रॉड, वोक्स, ट्रॉटने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 9 बाद 492 (पहिला डाव घोषित) इंग्लंड-पहिला डाव -32 धावा