आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashesh Test : Siddle Control Over The England Team

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅशेस कसोटी: सिडलच्या गोलंदाजीने यजमान इंग्लंडचे ‘वाजले बारा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रेंटब्रिज (नॉर्टिंगहॅम) - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलच्या धारदार आणि स्विंग गोलंदाजीपुढे अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सिडलने 50 धावांत 5 गडी बाद करीत इंग्लंडला 215 धावांत गुंडाळण्यात मोलाची कामगिरी बजावली. सिडलशिवाय पॅटिंसनने तिघांना टिपले.


सिडलने अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली. त्याने आपल्या आऊट स्विंगवर जो. रुट (30), जोनाथन ट्रॉट (48), इयान बेल (25), केविन पीटरसन (14) आणि मॅट प्रायर (1) यांना बाद केले. चहापानाच्या वेळेपर्यंत इंग्लंडची टीम 6 बाद 185 अशी संकटात सापडली होती. पुढच्या 4 विकेट अवघ्या 30 धावांत गारद झाल्या. इंग्लंडकडून ट्रॉटशिवाय कर्णधार कुकला 13 धावाच काढता आल्या. बेयरस्ट्रोने 37 धावांचे योगदान दिले. ब्रॉडने 25 धावा काढून खिंड लढवण्याचे प्रयत्न केले. स्वान 1 तर फिन आणि अँडरसन तर भोपळा न फोडताच बाद झाले.


वॉटसन, क्लार्क अपयशी
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर शेन वॉटसन 13 धावांवर बाद झाला. कर्णधार मायकेल क्लार्क (0) आणि कोवान (0) यांना तर भोपळा सुद्धा फोडता आला नाही. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 75 धावा काढल्या. त्यावेळी स्टिवन स्मिथ 38 आणि फिलिप हयुजेस 7 धावांवर खेळत होते.


संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 59 षटकांत 215. (ट्रॉट 48, बेयरस्ट्रो 37, ब्रॉड 24, 5/50 सिडल, 3/69 पॅटिंसन, 2/54 स्टार्क). ऑस्ट्रेलिया : 21 षटकांत 4/75. (स्टिवन स्मिथ नाबाद 38, हयुजेस नाबाद 07, 2/25 अँडरसन, 2/37 फिन).