आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅशेस मालिका: इंग्लंडला विजयाची संधी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉटिंगहॅम - अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली आहे. इयान बेलचे (109) शतक आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या (65) अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने दुस-या डावात सर्वबाद 375 धावा काढल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 311 धावांचे लक्ष्य दिले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत धावांचा पाठलाग करताना दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने 6 बाद 174 धावा काढल्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी इंग्लंडला 4 विकेट तर ऑस्ट्रेलियाला 137 धावांची गरज आहे.


दिग्गज फ्लॉप, रॉजर्सचे अर्धशतक
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून दुस-या डावात त्यांचे दिग्गज फलंदाज फ्लॉप झाले. कोवान (14), कर्णधार क्लार्क (23), स्टीव्हन स्मिथ (17), फिलिप ह्युजेस (0) हे फलंदाज लवकर बाद झाले. सलामीवीर वॉटसनने 46 तर रॉजर्सने अर्धशतक ठोकताना 52 धावा काढल्या. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी ब्रेड हॅडिन 11 आणि अगर एका धावेवर खेळत होते.


बेलचे 18 वे कसोटी शतक
शनिवारी बेलने आपले 18 वे कसोटी शतक साजरे केले. त्याने 267 चेंडूंचा सामना करताना 109 धावा काढल्या. यात त्याने 15 चौकार मारले. ब्रॉडने 148 चेंडूंचा सामना करताना 65 धावा काढल्या.


तांत्रिक चुकीसाठी हॉटस्पॉटने मागितली माफी
हॉटस्पॉटच्या अन्वेषकाने इंग्लंडचा फलंदाज जोनाथन ट्रॉटला तांत्रिक चुकीमुळे बाद दिल्याने माफी मागितली. पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी मिशेल स्टार्कचा चेंडू ट्रॉटच्या पॅडला लागला आणि पंचांनी पायचीतची ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मागणी धुडकावली. ऑस्ट्रेलियाने रेफरलची मागणी केली. यानंतर तिस-या पंचांनी मैदानी पंचाचा निर्णय चुकीचा ठरवत ट्रॉटला बाद दिले. ऑपरेटरच्या चुकीने मागचा चेंडू बघून ट्रॉटला बाद ठरवण्यात आले.


धावफलक
इंग्लंड पहिला डाव 215. ऑस्ट्रेलिया पहिला डाव 280.
इंग्लंड दुसरा डाव धावा चेंडू 4 6
कुक झे. क्लार्क गो. अगर 50 165 6 0
रुट झे. हॅडिन गो. स्टार्क 05 31 1 0
ट्रॉट पायचित गो. स्टार्क 0 1 1 0
पीटरसन त्रि. गो. पॅटिंसन 64 150 12 0
बेल झे. हॅडिन गो. स्टार्क 109 267 15 0
बेरिस्ट्रो झे. हॅडिन गो. अगर 15 62 0 0
प्रायर झे. कोवान गो. सिडल 31 42 6 0
ब्रॉड झे. हॅडिन गो. पॅटिंसन 65 148 7 0
स्वान झे. क्लार्क गो. सिडल 09 28 1 0
फिन नाबाद 02 08 0 0
अँडरसन झे.हयुजेस गो.सिडल 00 2 0 0
अवांतर : 25. एकूण : 149.5 षटकांत सर्वबाद 375. गोलंदाजी : जेम्स पॅटिंसन 34-5-101-2, मिशेल स्टार्क 32-7-81-3, एस्टन अगर 35-9-82-2, सिडल 33.5-12-85-3, वॉटसन 15-11-11-0.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव धावा चेंडू 4 6
वॉटसन पायचीत गो. ब्रॉड 46 74 8 0
रॉजर्स झे.बेल गो. अ‍ॅँडरसन 52 121 8 0
कोवान झे.ट्रॉट गो. ज्यो रुट 14 43 3 0
क्लार्क झे.प्रायर गो. ब्रॉड 23 70 2 0
स्मिथ पायचीत गो. स्वान 17 48 2 0
ह्युजेस पायचीत गो. स्वान 0 8 0 0
हॅडीन नाबाद 11 39 1 0
एश्टन अगर नाबाद 1 24 0 0
अवांतर : 10. एकूण : 71 षटकांत 6 बाद 174 धावा. गोलंदाजी : अ‍ॅँडरसन 17-4-44-1, ब्रॉड 16-5-34-2, स्वान 28-5-64-2, फिन 8-3-17-0, रुट 2-0-6-1.