आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Dinda Ties Knot After 4 Year Long Love Affair

साक्षी, अंजलीपेक्षा वेगळी अदा आहे या नव्‍या नवरीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- टीम इंडियाचा स्‍पीडस्‍टार अशोक डिंडाने आपल्‍या वैयक्तिक जीवनचा गिअर बदलून नवीन आयुष्‍यास सुरूवात केली आहे. सोमवारी जेव्‍हा संपूर्ण जग ब्रिटनच्‍या रॉयल बेबीच्‍या जन्‍माचा आनंद साजरा करत होते. त्‍याचवेळी डिंडाने श्रेयसी रूद्रशी विवाह केला.

हुगलीमधील चिनसुरह येथे बंगाली परंपरेप्रमाणे लग्‍न झाले. लग्‍नाला त्‍याचा मित्र मनोज तिवारीही आला होता. मनोजचेही नुकतेच लग्‍न झाले आहे.

डिंडाची पत्‍नी श्रेयसी क्रिकेटची मोठी चाहती आहे. व्‍यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्‍या श्रेयसीबरोबर लग्‍न करण्‍याचा निर्णय डिंडाने आयपीएलदरम्‍यानच घेतला होता. 24 तारखेला दोघांच्‍या लग्‍नाचा स्‍वागत समारंभ आयोजित करण्‍यात आला आहे.