आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashwin And Gambhir Likely To Play In Manchester Test For Dhoni

भारत-इंग्‍लंड कसोटी : अश्विन आणि गंभीरला अंतीम 11 मध्‍ये घेऊ शकतो धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - सराव करताना अश्विन)
मँचेस्‍टर - भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याला गुरुवारपासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरुवात होत आहे. भारतीय संघातील दिग्‍गज खेळाडूंचा हरवलेला फॉर्म कर्णधार धोनीची डोकेदुखी ठरत आहे. त्‍यामुळे धोनी या खेळाडूंना डच्‍चू देवून फिरकीपटू अश्विन आणि डावखूरा फलंदाज गौतम गंभीरला अंतीम 11 मध्‍ये घेवू शकतो.
अश्विनला संघात घेतल्‍यास फायदा
दक्षिण आफ्रिका आणि न्‍युझीलंड दौ-यावर भारतीय फिरकीपटूंना प्रतिस्‍पर्धी खेळाडूंनी चांगले धूतले होते. त्‍यामुळे धोनी फिरकीपटूला संघात घ्‍यायला थोडासा कचरत आहे. परंतु अश्विनला संघात घेतल्‍यास भारतीय संघाला फायदाच होणार आहे. त्‍याने आतापर्यंत 19 कसोटी सामन्‍यांमध्‍ये 28.50 च्‍या सरासरीने 104 विकेट पटाकाविल्‍या आहेत.

बॅटिंगमध्‍येही चांगला
अश्विनला अंतीम 11 मध्‍ये घेण्‍यात संघाला दुहेरी फायदा होणार आहे. कारण्‍ा अश्विन उत्‍कृष्‍ट गोलंदाजाबरोबरच चांगला फलंदाजही आहे. आतापर्यंत त्‍याने 26 कसोटीमध्‍ये 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. 39.40 च्‍या सरासरीने त्‍याने 788 धावा केल्‍या आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, सलामीच्‍या फलंदाजीचे 'गंभीर' समाधान