आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंदूर - येत्या 1 एप्रिलपासून इंदुरात बाराव्या आशियाई बिलियर्डस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. दुसरीकडे 21 वर्षांखालील 14 वी आशियाई स्नूकर चॅपियनशिप इंदुरातील टेनिस क्लबमध्ये आयोजित करण्यात आली. या दोन्ही स्पर्धा 1 ते 7 एप्रिलदरम्यान होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांवर चार लाख 25 हजारांच्या बक्षिसांचा वर्षाव होईल.
पाकिस्तानचे दोन खेळाडूदेखील स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ज्युनिअर स्नूकर स्पर्धेसाठी पाकच्या हमजा अकबर आणि मोहंमद माजिद अली या दोघांना व्हिसा मिळाला आहे. स्पर्धेसाठी तब्बल 30 लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी इंदूर टेनिस क्लबमध्ये खास वातानुकूलित हॉल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मप्र बिलियर्डस स्नूकर असोसिएशनचे अध्यक्ष भोलू मोहता आणि स्पर्धेचे सचिव विश्वेष पुराणिक यांनी दिली.
विजेत्यास एक लाख 25 हजारांचे बक्षीस
बिलियर्डस स्पर्धेतील विजेत्यास एक लाख 25 हजार आणि उपविजेत्यास 65 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासारखी बक्षीस रक्कम स्नूकरमध्ये विजेता व उपविजेत्यास मिळेल. दुसरीकडे स्नूकरमध्ये सेमीफायनलिस्टला प्रत्येकी 30 हजारांचे बक्षीस देण्यात येईल.
थावत, झाऊला अव्वल मानांकन
बिलियर्डसमध्ये थायलंडच्या थावत आणि स्नूकरमध्ये चीनच्या झाऊ येलोंगला अव्वल मानांकन मिळाले आहे. बंगळुरूचा किशोरकुमार खुराणादेखील स्पर्धेत सहभागी झाला आहे. स्पर्धेत भारतासह चीन, हॉँगकॉँग, पाकिस्तान, म्यानमार, इराक, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि श्रीलंकेतील खेळाडूंचा समावेश आहे.
बिलियर्डस चॅम्पियनशिपमध्ये के.बी.भास्कर, ध्वज हरिया, आलोककुमार भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच स्नूकरमध्ये इशप्रीत चढ्ढा, ध्वज हरिया, मल्कीत सिंग, विशाल वाया, राहुल सचदेव, नितेश मदत हे खेळाडू भारताकडून खेळणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.