आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ASIA CUP: आशिया चषकामध्‍ये विराट समोर असतील ही पाच आव्‍हानं!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेश: कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाच्‍या कर्णधारपदाची धुरा विराट कोहली सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्‍युझीलंडमध्‍ये झालेल्‍या खराब का‍मगिरीनंतर संघाचे नेतृत्‍व करणे हे अत्‍यंत कठीण काम असून, आपण हे आव्‍हान पेलायला तयार असल्‍याचेही विराट कोहलीने माध्‍यमांशी बोलताना सांगितले. भारताचा पहिला सामना 26 फेब्रुवारी रोजी यजमान बांगलादेश विरध्‍द खेळला जाणार आहे.
कर्णधारपद आव्‍हानदायक
'आशिया चषकाचे मी कर्णधारपद भूषवित आहे. याची तुलना कायम कर्णधारपदी असलेल्‍या व्‍यक्‍तीशी करणे चुकीचे आहे. कारण अशा वेळी आपण जिंकल्‍यास कौतुकाचा वर्षाव होतो तर पराभूत झाल्‍यास निंदा होते. आतापर्यंत मी आठ सामन्‍यांचे कर्णधारपद भूषविले असून त्‍याचा मला फायदा होईल. असे विराट कोहली म्‍हणाला.
युवा खेळाडूंमध्‍ये चांगला ताळमेळ
विराटने आपल्‍या संघाविषयी बोलतांना म्‍हटले, की 'संघामध्‍ये उत्‍कृष्‍ट युवा खेळाडुंचा समावेश असून चांगला ताळमेळ आहे. त्‍यामुळे आपण आशावादी असून आशिया चषकासाठी उत्‍साही आहे'.
पाकिस्‍तान संघाविषयी विचारणा करताच कोहली म्‍हणाला, की फक्‍त पाकिस्‍तानसोबतच जिंकने आमचे लक्ष नसून संपुर्ण स्‍पर्धा जिंकण्‍याचे आमचे लक्ष आहे.
भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रो‍हीत शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, अंबाती रायडू, अजिंक्‍य रहाणे, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्‍मद शमी, वरुण अरोरा, स्‍टुअर्ट विन्‍नी, अमित मिश्रा आणि ईश्‍वर पांडे
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणती आहेत पाच आव्‍हान