आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार असून या हाय होल्टेज सामन्याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दुपारी 1.30 वाजता सुरू होणारा हा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, मीरपूर येथे होईल. स्पर्धेत टीम इंडियाने दोन सामने खेळले असून एकात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने दोन सामन्यांत एका विजयासह बोनस गुण मिळवत 5 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळत असून पाकिस्तानचे कर्णधारपद मिसबाह-उल-हक भूषवत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यास मदत होईल.
भारताची उजवी बाजू
शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे वरवींद्र जडेजा शानदार फॉर्मात आहेत. विराटने बांगलादेशविरुद्ध 136 धावा काढल्या होत्या.
भारताची दुबळी बाजू
रोहित शर्मा, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक आणि स्टुअर्ट बिन्नी यांच्यापैकी एकानेसुद्धा स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केलेली नाही. गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य नाही.
पाकची दुबळी बाजू
अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध पाकने अवघ्या 117 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. मिसबाह आणि अष्टपैलू खेळाडू मोहंमद हाफिज यांना आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आलेली नाही.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, ईश्वर पांडे.
पाकिस्तान : मिसबाह-उल-हक (कर्णधार), शार्जिल खान, अहेमद शहजाद, मो. हाफिज, शोएब मकसूद, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी, अन्वर अली, उमर गुल, सईद अजमल, जुनैद खान, बिलावल भट्टी.
अफगाणिस्तानची बांगलादेशवर मात
फातुल्लाह - अफगाणिस्तानने शनिवारी आशिया चषकात पहिला विजय मिळवला. या टीमने बांगलादेशला 32 धावांनी पराभूत केले. मोहंमद नबी (3/44), हमीद हसन (2/26), शापूर झद्रानच्या (2/39) धारदार गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्ताने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 6 गडी गमावून 254 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान टीमचा 47.5 षटकांत 222 धावांवर धुव्वा उडाला. असगर स्तानिकजाई (नाबाद 90) आणि समिउल्ला शेनवारी (81) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने 254 धावा काढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.