आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup Bangladesh India Cricket Virat Kohli Latest Sport News In Marathi

ASIA CUP: कोहली समोर आव्‍हान, यजमानांना पराभूत करण्‍याचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- आशिया चषकामध्‍ये आज(बुधवार) दुस-या दिवशी भारत विरुध्‍द यजमान बांगलादेश या उभय संघामध्‍ये लढत होणार आहे. यजमानांना मायदेशात पराभूत करण्‍यासाठी कर्णधार विराट कोहलीची कसोटी लागणार आहे.

विदेशामध्‍ये सतत खराब कामगिरी करणा-या भारतीय संघाला या वर्षातील पहिल्‍या विजयासाठी झुंजावे लागणार आहे. भारतासमोर सर्वात मोठे आव्‍हान असेल ते बांगलादेशीय फलंदाज शमसूर रहमानचे. कारण न्‍यूझीलंडला व्‍हाईट वॉश देण्‍यात त्‍याचा मोलाचा वाटा होता.

बांगलादेशने नुकत्याच झालेल्या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारला असला, तरी त्यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे भारताविरुद्ध ते चांगली कामगिरीसाठी उत्सुक असतील.

गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची
फलंदाजांप्रमाणे बांगलादेशात गोलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची असेल. न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या मालिकेत मोहंमद शमी, रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू जडेजा आणि वरुण अँरोन यांची कामगिरी चांगली झाली होती. याशिवाय वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेलाही संधी मिळू शकते. सराव सामन्यात त्याने चार विकेट घेऊन स्वत:ला सिद्ध केले.

काय असेल आव्हान ?
टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज विदेशी भूमीवर सलगपणे अपयशी ठरत आहेत. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीपुढे मोठा स्कोअर उभा करण्याचे आव्हान असेल. चेतेश्वर पुजारा आणि अंबाती रायडू यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्यांच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल. स्टुअर्ट बिन्नी आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भूमिका पार पाडतील. अंतिम अकरा खेळाडूंत कोणाकोणाला संधी मिळेल, हे पाहणे रोमांचक ठरेल.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...