आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup Cricket Competation: Match Between India And Pakistan On 2 March

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा :भारत-पाकिस्तान काट्याची लढत 2 मार्चला रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - भारत आणि पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात दोन मार्चला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काट्याची लढत रंगणार आहे. नुकतेच आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) बांगलादेशात फेब्रुवारी-मार्चदरम्यान होणा-या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. येत्या 25 फेब्रुवारीपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत पाच संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेत पाकिस्तान संघ सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला एसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्रफुल हक यांनी दुजोरा दिला. तसेच पाकिस्तान संघाने स्पर्धेतून माघार घेतली असती तरीही निश्चित वेळापत्रकाप्रमाणेच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असती, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या टीमला कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची हमी आयोजक बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिली आहे. त्यामुळे पाकचा या स्पर्धेतील प्रवेशही निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता 22 फेब्रुवारीला चोख बंदोबस्तात पाक टीमचे ढाक्यात आगमन होईल. सुरुवातीच्या दोन दिवसांदरम्यान पाक संघ सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर पाक आणि श्रीलंका यांच्यात उद्घाटनीय सामना होईल. त्यानंतर पाकचा सामना दोन मार्चला भारतासोबत होणार आहे.
आशिया चषक वेळापत्रक
25 फेबु्र. पाक वि. श्रीलंका फातुल्ला
26 फेबु्र. भारत वि. बांगलादेश फातुल्ला
27 फेबु्र. अफगाण वि. पाक फातुल्ला
28 फेबु्र. भारत वि. श्रीलंका फातुल्ला
1 मार्च बांगलादेश वि. अफगाण फातुल्ला
2 मार्च भारत वि. पाक फातुल्ला
3 मार्च अफगाण वि. श्रीलंका मीरपूर
4 मार्च बांगलादेश वि. पाक मीरपूर
5 मार्च भारत वि. अफगाण मीरपूर
6 मार्च बांगलादेश वि. श्रीलंका मीरपूर
8 मार्च अंतिम सामना मीरपूर
सहभागी संघ
भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान