आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे ‘मिशन आशिया कप’, भारतीय संघ बांगलादेशात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - सलगच्या पराभवांनी टीकेच्या तोंडी असलेली टीम इंडिया आता ‘मिशन आशिया कप’ यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी भारतीय संघ रविवारी बांगलादेशात दाखल झाला. मंगळवारपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे रविवारी सकाळी ढाक्यात आगमन झाले.

भारताचा पहिला सामना बुधवारी यजमान बांगलादेशाशी होईल. त्यानंतर 28 फेब्रुवारीला भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. दोन मार्चला भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान समोरासमोर असतील. भारत-अफगाणिस्तान सामना पाच मार्चला होईल. जखमी धोनीच्या जागी विराट कोहली स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच धोनीच्या जागी दिनेश कार्तिककडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली.

भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, मो.शमी, वरुण अ‍ॅरोन, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, ईश्वर पांडे.