आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक आजपासून; भारताचा पहिला सामना 26 फेब्रुवारी रोजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने मंगळवारपासून आशिया चषक क्रिकेट स्पध्रेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असून, स्पध्रेत विजयी सलामी कोणता संघ देतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
पाक संघाची मदार कर्णधार मिसबाह-उल-हक, अहेमद शहेजाद, शाहिद आफ्रिदी, अष्टपैलू खेळाडू मोहंमद हाफिज, उमर अकमल यांच्यावर असेल. गोलंदाजीत उमर गुल, जुनेद खान, सईद अजमल, आफ्रिदी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल.

श्रीलंका संघात कर्णधार अँग्लो मॅथ्यूजसह दिनेश चांदिमल, माजी कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान, लाहिरू थिरिमाने यांच्यावर मदार असेल. गोलंदाजीत श्रीलंकेकडे लेसिथ मलिंगा, नुवान कुलशेखरा, अजंता मेंडिस, सचित्र सेनानायके, तिसरा परेरा हे खेळाडू आहेत.

नेतृत्व कठीण काम
सध्या भारताचे नेतृत्व करणे खूप कठीण काम आहे. मात्र, मी या आव्हानासाठी सज्ज आहे, असे टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने म्हटले. मंगळवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषकासंबंधी टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची आशा त्याने व्यक्त केली. विराट म्हणाला, ‘आता आम्ही पराभूत होऊन आलो आहोत. मालिका पराभवानंतर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वेळी चारही बाजूंनी टीकेसाठी सज्ज राहावे लागते,’ असे त्याने नमूद केले.

एकाच सामन्यावर लक्ष नाही
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध लढतीबाबत विचारले असता विराट म्हणाला, आम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो आहोत. फक्त एकाच सामन्यावर आमचे लक्ष नाही.

युवांसोबत ताळमेळ चांगला
आमच्या संघात बरेच शानदार युवा खेळाडू आहेत. यामुळे मी खूप आशावादी आणि उत्साहीसुद्धा आहे. मी त्यांच्यासोबत सहज बोलू शकतो आणि त्यांच्याशी माझा ताळमेळही चांगला आहे. स्पध्रेत आमची कामगिरी आतापर्यंत चांगली ठरली आहे. या वेळीसुद्धा आशिया चषकात ठसा उमटवण्यास तयार आहोत, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने या वेळी म्हटले आहे.

प्रभारी कर्णधारपद आव्हानात्मक
मी फक्त एकाच स्पध्रेसाठी कर्णधारपद भूषवत आहे. संघासाठी नेहमी नेतृत्व करण्याच्या जबाबदारीपेक्षा हे वेगळे आणि खूप भिन्न काम आहे. जिंकतो तेव्हा सारेजण स्तुती करतात, मात्र पराभवाच्या वेळी टीकासुद्धा सहन करावी लागते, असे विराट कोहली म्हणाला.

आशिया चषकाचे वेळापत्रक
दिनांक संघ स्थळ
25 फेब्रुवारी पाकिस्तान-श्रीलंका फातुल्लाह
26 फेब्रुवारी बांगलादेश-भारत फातुल्लाह
27 फेब्रुवारी अफगाण-पाकिस्तान फातुल्लाह
28 फेब्रुवारी भारत-श्रीलंका फातुल्लाह
01 मार्च बांगलादेश-अफगाण फातुल्लाह
02 मार्च भारत-पाकिस्तान मिरपूर
03 मार्च अफगाण-श्रीलंका मिरपूर
04 मार्च बांगलादेश-पाकिस्तान मिरपूर
05 मार्च अफगाण-भारत मिरपूर
06 मार्च बांगलादेश-श्रीलंका मिरपूर
08 मार्च फायनल मिरपूर