आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - गतविजेत्या पाकिस्तानने विजयासह आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह भारताचे फायनलमधील प्रवेशाचे स्वप्न भंगले. पाकने मंगळवारी बांगलादेशला 3 गड्यांनी हरवले. शहजाद (103)व सामनावीर शाहिद आफ्रिदी (59) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने तीन बाद 326 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकने 49.5 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. आता आशिया चषकावरचे वर्चस्व राखून ठेवण्यासाठी पाकला अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. धावांचा पाठलाग करणा-या पाकला हाफिज (52) आणि शहजाद यांनी 97 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर शहजादने फवादसोबत (74) चौथ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली. दरम्यान, आफ्रिदी आणि फवादने सहाव्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या सलामीवीर अनामुल हकने (100) शतक झळकावले. या शतकाच्या बळावर यजमान संघाने 326 धावांची खेळी केली. यात कर्णधार मुशाफिकुर रहीम (नाबाद 51), मोमिनुल (51) आणि कायेसनेही (59) अर्धशतकाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : 3 बाद 326 धावा,
पाकिस्तान : 7 बाद 329.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.