आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रीलंका टीमने विजयाची हॅट्ट्रिक करीत सोमवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेने तिस-या सामन्यात अफगाणिस्तानचा 129 धावांनी पराभव करीत बाजी मारली. श्रीलंकेचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. यापूर्वी श्रीलंकेने पाकसह भारताचा पराभव केला होता. आता गुणतालिकेत श्रीलंकेचे सर्वाधिक 13 गुण झाले आहेत. तीन सामन्यांतील नऊ गुणांसह पाकिस्तान दुस-या आणि चार गुणांसह भारत तिस-या स्थानावर आहे.
तिसारा परेरा (3/29), अजंता मेंडिस (3/11) आणि सुरंगा लकमल (2/29) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने सामन्यात अफगाणिस्तानचा 124 धावांवर धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 गड्यांच्या मोबदल्यात 253 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणला 38.4 षटकांत 124 धावांपर्यंत मजल मारता आली.
गत सामन्यात यजमान बांगलादेशला पराभूत करणा-या अफगाणिस्तानला श्रीलंकेविरुद्ध सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. धावांचा पाठलाग करणा-या अफगाणकडून कर्णधार नबीने सर्वाधिक 37, असगरने 27 आणि नूर अलीने 21 धावांची खेळी केली. अफगाणचे सहा फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले.
तत्पूर्वी श्रीलंकेकडून सामनावीर संगकाराने 76 धावांची खेळी केली. मॅथ्यूजने नाबाद 45 धावा काढल्या. गत सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावणा-या संगकाराने सोमवारी शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 102 चेंडूंचा सामना करताना सहा चौकार आणि एका षटकारासह संघाकडून सर्वाधिक 76 धावा काढल्या. याशिवाय त्याने दिनेश चांदीमलसोबत (26) चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूज आणि तिसरा परेराने सातव्या विकेटसाठी अभेद्य 69 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली.
आशिया चषक गुणतालिका
संघ सामने गुण रनरेट
श्रीलंका 3 13 +0.971
पाकिस्तान 3 9 +0.438
भारत 3 4 0.027
अफगाण 3 4 -0.127
बांगलादेश 2 0 0.384
धावफलक
श्रीलंका धावा चेंडू 4 6
परेरा त्रि.गो. मिरवाईस अश्रफ 33 49 4 1
थिरीमाने झे. शापूर गो. झद्रान 5 16 0 0
संगकारा धावबाद (झद्रान/नबी) 76 102 6 1
जयवर्धने झे. नबी गो. अश्रफ 14 14 2 0
चांदीमल त्रि.गो. हमझा होताक 26 41 1 0
अॅँग्लो मॅथ्यूज नाबाद 45 41 4 0
सिल्वा झे.अश्रफ गो. झद्रान 17 16 1 0
तिसारा परेरा नाबाद 19 23 0 0
अवांतर : 18. एकूण : 50 षटकांत 6 बाद 253 धावा. गोलंदाजी : एन. झद्रान 3-0-9-0, शापूर झद्रान
9-1-46-1, दवलत झद्रान 9.2-0-60-1, मिरवाईस अश्रफ 8-1-29-2, मोहंमद नबी 6.4-1-23-0, हमझा होताक 7-1-43-1, शमील्लाह शेनवारी 4-0-20-0, नवरोज मंगल 3-0-17-0.
अफगाणिस्तान धावा चेंडू 4 6
मोहंमद शहजाद त्रि.गो. लकमल 7 7 0 1
नूर झे. डिसिल्वा गो. मेंडिस 21 41 2 0
असगर त्रि.गो. तिसरा परेरा 27 34 5 0
नवरोज झे. संगकारा गो. लकमल 4 13 0 0
शेनवारी झे.थिरीमाने गो. लकमल 6 19 0 0
मो.नबी पायचीत गो. डिसिल्वा 37 43 3 1
एन.झद्रान झे.मॅथ्यूज गो. परेरा 11 35 1 0
अश्रफ झे.परेरा गो. डिसिल्वा 1 18 0 0
हमझा पायचीत गो. मेंडिस 1 14 0 0
डी.झद्रान त्रि.मेंडिस 0 8 0 0
शापूर झद्रान नाबाद 0 0 0 0
अवांतर : 9. एकूण : 38.4 षटकांत सर्वबाद 124 धावा. गोलंदाजी : मलिंगा 5-0-23-0, लकमल 7-2-30-2, परेरा 10-2-29-3, डिसिल्वा 9.4-1-29-2, मेंडिस 7-2-11-3.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.