आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Cup News In Marathi, Srilanka Versus Pakistan Match, Divya Marathi

आशिया चषक : श्रीलंका- पाकिस्तान आज कांटे की टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - गतविजेता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची फायनल रंगणार आहे. या सामन्याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. श्रीलंका टीमने सलग चार सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. तसेच पाकने तीन सामन्यांतील विजयासह फायनलमधील प्रवेश निश्चित केला होता.


दुस-या विजेतेपदासाठी उत्सुक असलेला पाकिस्तान संघ सध्या खेळाडंूच्या वाढत्या दुखापतीमुळे अडचणीत सापडला आहे. सध्या ऑलराउंंडर शाहिद आफ्रिदी, उमर गुल, शर्जिल खान आणि अहमद शहजादला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे पाकसमोर श्रीलंकेचे आव्हान रोखण्याचे मोठे आव्हान आहे. पाकला अनुभवी फलंदाज कुमार संगकारावर अंकुश ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. याशिवाय मलिंगा आणि फिरकीपटू अजंथा मेंडिसच्या गोलंदाजीचा पाकच्या फलंदाजांना धाडसाने सामना करावा लागणार आहे.


मलिंगाने गतसामन्यात मिसबाह व आफ्रिदीला बाद केले होते. संगकारादेखील फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत एका शतकासह दोन अर्धशतकांची खेळी केली.
दुसरीकडे पाकिस्तानने आफ्रिदीने केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर दुस-यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आफ्रिदीने भारतविरुद्ध सामन्यात शेवटच्या षटकात दोन षटकार ठोकून पाकला शानदार विजय मिळवून दिला. तसेच त्याने बांगलादेशविरुद्ध 25 चेंडूंत 59 धावा काढल्या.


संभाव्य संघ
पाकिस्तान : मिसबाह-उल-हक (कर्णधार), अहमद शहजाद, मोहंमद हाफिज, शोएब मकसूद, फवाद आलम, अब्दुर रहमान, शाहिद आफ्रिदी, उमर अकमल, उमर गुल, मोहंमद ताल्हा, सईद अजमल, बिलावल भट्टी, जुनैद खान, अन्वर अली, शर्जिल खान.
श्रीलंका : मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, लाहिरी थिरीमाने, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, अशान प्रियरंजन, चतुरंगा डिसिल्वा, टी.परेरा, सचित्रा सेनानायके, अजंथा मेंडिस, सुरंगा लकमल, दिनेश चांदिमल, धमिका प्रसाद.