आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Junior Wightlifting Championship: India Bag Up Two Medal

आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप : भारताला पहिल्याच दिवशी दोन पदके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिशकेक - किर्गिस्तान येथे शुक्रवारपासून 20 वी महिला आणि 27 व्या पुरुषांच्या आशियाई ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने दोन पदकांची कमाई केली. यामध्ये एक रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. सैखोम मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या गटात ही उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच अपूर्वा चेतियानेही चानूच्या कामगिरीला उजाळा दिला. तिने महिलांच्या 56 किलो वजनगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या वेळी तिने केलेले प्रयत्न अपयशी ठरले. या स्पर्धेत 13 सदस्यीय भारतीय संघ सहभागी झाला आहे. यामध्ये सहा पुरुष व सात महिला खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत मोठ्या संख्येत पदकांची आशा आहे.