आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Atheletics: Asian Warkari Today Starts Playing

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा: आशियन वारक-यांची आजपासून मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यात 3 ते 7 जुलैदरम्यान होणा-या 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी 20 देशांचे आशियन वारक-यांची पथके धडकली असून, मंगळवारी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. स्पर्धेत भारताचा 96 खेळाडूंचा संघ सहभागी होणार असून, त्या खालोखाल जपानचा 72 खेळाडूंचा संघ आहे. 575 पेक्षा अधिक खेळाडू पुण्यात दाखल झाले आहेत.
पावसाचे सावट : स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी थाटात पार पडेल अशी आशा क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. कमी वेळेत आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने आणि व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पावसाने साथ दिल्यास स्पर्धा दिमाखात पार पाडू, असे ते म्हणाले.


भारताचे जम्बो पथक :
स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचे जम्बो पथक सहभागी झाले असून, आतापर्यंत सहभागी झालेल्या 20 देशांमध्ये भारतीय संघ सर्वांत मोठा आहे. यात महाराष्ट्राचे 10 खेळाडू सहभागी होत असून, स्पर्धेच्या इतिहासात महाराष्ट्राच्या खेळाडूंची ही सर्वांत मोठी संख्या आहे. यात अनिरुद्ध गुज्जन (100 मी.), कृष्णकुमार राणे (100 मी.), प्रतीक निनावे (200 मी.), मो. यनूस (5000 मी.), सिद्धान्त थिंगलिया (110 मी. हर्डल्स), रामचंद्रन (400 मी. हर्डल्स), के. दिलीपकुमार (डेकॅथलॉन), कविता राऊत (5000 मी.), भाग्यश्री शिर्के (4 बाय 100 मी. रिले), मोनिका आथरे (10 हजार मी.) यांचा समावेश आहे.


02 तास रंगेल उद्घाटन सोहळा
42 देशांचा स्पर्धेत सहभाग
20 देशांचे 575 खेळाडू दाखल
96 खेळाडूंचा भारतीय संघ
10 खेळाडू महाराष्ट्राचे


बाबा- दादांची उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री पद्माकर वळवी, क्रीडा व युवक कल्याण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, महापौर वैशाली बनकर, पिंपरी चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव मॉरिस निकोलस, महाराष्ट्राचे मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया उपस्थित राहणार आहेत.