आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक : भारताचा फायनलमध्ये पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह - सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दक्षिण कोरियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. गतविजेत्या कोरियाने 4-3 अशा फरकाने विजय मिळवला. आता भारतीय संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठी ओसिनिया चॅम्पियनशिपच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. भारताने सामन्यात दोन वेळा पिछाडीवर पडल्यानंतरही बरोबरी साधली. मात्र, कोरियाने 68 व्या मिनिटाला चौथा गोल करून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या. या संघाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून किताब आपल्या नावे केला.

कोरियाची दमदार सुरूवात
फायनलमध्ये पहिल्या हाफमध्ये कोरियाने सुरेख खेळी करताना एका मिनिटांच्या अंतराने 2-0 ने आघाडी मिळवली. जांग जोंग ह्यूनने 28 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर अवघ्या एक मिनिटात यू ह्यो सिकने मैदानी गोल करून संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

भारताने दोन वेळा साधली बराबेरी
भारताने दुसर्‍या हाफमध्ये दोन वेळा बरोबरी साधली. रूपिंदर लाल (48 मि.), निकिन थिमय्याने (55 मि.) गोल करून भारताला 2-2 ने बरोबरी मिळवून दिली. नैम ह्यूनने गोल करून 3-2 ने संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 65 व्या मिनिटाला मनदीपने गोल केला. यासह भारताने पुन्हा 3-3 ने बरोबरी साधली.