आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Games 2014: Indian Women\'s Kabaddi Team Wins Gold News In Divyamarathi

आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाचे सूवर्ण सीमोल्लंघन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: भारतीय महिला कबड्डी संघ)

इन्चिऑन- साउथ कोरियामध्ये सुरु असलेल्या 17 व्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सूवर्णपदक पटकावून सोनेरी सीमोल्लंघन केले आहे. महिला कबड्डीपट्टूंनी शानदार कामगिरी करत इराणच्या संघाचा 31-21 असा धुव्वा उडवला. या पदकासह भारताच्या खात्यात 10 सूवर्णपदक जमा झाले आहेत.

भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. हाफ टाइमपर्यंत भारतचा स्‍कोर इरानविरुद्ध 15-11 असा होता. सेकंड हाफमध्ये भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करत सामना समाप्त होण्याच्या 10 मिनिटांपूर्वी इराणवर 25-16 अशी मात केली होती.
दरम्यान आजच पुरुष कबड्डी संघाचाही अंतिम सामना असणार आहे. त्यामुळे भारताला आणखी एक सूवर्णपदक मिळवण्याची नामी संधी आहे.