आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games 2014 News In Marathi, Abhinav Bindra, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अभिनव बिंद्राने मिळवले दोन कांस्यपदके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशीसुद्धा भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मंगळवारी स्क्वॅशमध्ये सौरव घोषालकडून सुवर्णपदकाची आशा होती. मात्र, फायनलमध्ये त्याचा पराभव झाला आणि भारताला रौप्यपदक मिळाले. नेमबाजीत अभिनव बिंद्राने आपल्या अखेरच्या एशियाडमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. अभिनवने १० मी. एअर रायफल वैयिक्तक स्पर्धेत कांस्य आणि याच इव्हेंटमध्ये संजीव राजपूत, रवी कुमार यांच्यासोबत सांघिक कांस्यपदक मिळवले. वुशूमध्ये सनातोई देवी आणि नरेंद्र ग्रेवाल यांनी कांस्यपदक ताब्यात घेतले. नेमबाजीत भारतीय महिला खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.

बिंद्राची दमदार कामगिरी
१० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत पाचवे स्थान मि ळवत बिंद्राने फायनलसाठी क्वालिफाय केले. त्याचा स्कोअर ६२५ असा होता. फायनल राउंडमध्ये बिंद्राने १८७.१ चा स्कोअर केला. बिंद्राने वैयक्तिक स्पर्धेत अखेरचा नेम लावताच त्याची मान खाली झुकली. या वेळी त्याचा स्कोअर १०.५ असा होता. नेमबाजीत एका पॉइंटचे अंतरसुद्धा खूप मानले जाते. बिंद्राने १०.९ चा स्कोअर केला असता तर ती सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली असती. मात्र, बिंद्रा खूप मागे होता. इराणच्या नेमबाजाने ९.६ चा नेम लावताच बिंद्राने सुटकेचा नि:श्वास टाकला. या स्पर्धेत चीनच्या काओ यिफेईने २०८.९ गुणांसह रौप्य तर चीनच्याच यांग हाओरानने २०९.६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. त्याने यावर्षी सुद्धा राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण िजंकले होते. ही आपली अखेरची एिशयाड स्पर्धा असेल, असे त्याने स्पर्धेपूर्वीच घोषित केले होते.

१० मी. एअर रायफलमध्ये कांस्य : अिभनव बिंद्रा, रवी आणि संजीव राजपूत यांच्या संघाने एकूण १८६३ गुण िमळवत ितसरे स्थान पटकावले. यजमान दक्षणि कोरियाने १८६७ गुणांसह रौप्य तर चीनने १८८६ गुणांसह सुवर्ण जिंकले.

नियम कठीण
नव्या नियमांमुळे नेमबाजी अधिक कठीण झाली आहे. तुम्ही कोणते पदक जिंकणार, याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. येथे पदकासह मी एशियाडमधून निवृत्ती घेत आहे.
- अभिनव बिंद्रा, नेमबाज.

ट्रॅप शूटरचा नेम चुकला
श्रेयसी सिंग, सीमा तोमर आणि शगुन चौधरी यांच्या संघाने मंगळवारी महिलांच्या ट्रॅप प्रकारात निराशाजनक कामगिरी केली. फायनल्समध्ये त्यांनी आठवे स्थान पटकावले. या ितघींच्या महिला संघाने १८८ गुणांचा स्कोअर केला. श्रेयसी िसंगने ६६, सीमाने ६३ आणि शगुनने ५९ चा स्कोअर केला. श्रेयसीने पहिल्या, दुस-या आणि तिस-या फेरीत २०, २४ आणि २२ चा स्कोअर केला. शगुनने तीन फे-यात अनुक्रमे २०, १९, २० चा स्कोअर तर सीमाने २०, १९ आणि २४ गुण िमळवले. या गटात कझािकस्तानने सर्वािधक २०३ गुणांसह सुवर्णपदक तर चीनने १९९ गुणांसह रौप्य आणि कोरियाने १९८ गुणांसह कांस्यपदक िजंकले. महिला संघाने पदक िजंकण्याची चांगली संधी दवडली.

१० मी. एअर रायफलमध्ये कांस्य
अिभनव िबंद्रा, रवी कुमार आणि संजीव राजपूत यांच्या संघाने एकूण १८६३ गुण िमळवत ितसरे स्थान पटकावले. यजमान दक्षणि कोरियाने १८६७ गुणांसह रौप्यपदक तर चीनने १८८६ गुणांसह सुवर्णपदक िजंकले.

स्वर्ण सिंगसह भारतीय संघाचे पदक निश्चित
स्टार खेळाडू स्वर्ण सिंगसह भारताच्या महिला आणि पुरुष संघाने मंगळवारी आशियाई स्पर्धेच्या राेइंग प्रकारातील भारताचे पदक निश्चित केले. स्वर्ण सिंगने पुरुषांच्या एकेरी स्कल्स रेपचेज प्रकारात शानदार कामगरिी करताना अंतिम फेरी गाठली. त्याने ७ तास १० मिनिटे ९३ सेकंदांत दाेन हजार मीटरचे अंतर पूर्ण करून अव्वल स्थान गाठले. यासह त्याने पदकाच्या फेरीत धडक मारली. त्यापाठाेपाठ ओमप्रकाश- भाेकानल दत्तूने पुरुषांच्या दुहेरी स्कल्स रेपचेजची अंतिम फेरी गाठली. या खेळाडूंनी ६:४०:७७ सेकंदांत अंतर पूर्ण केले. तसेच रालिया राकेश, विक्रम सिंग, साेनू लक्ष्मी नारायण, शाेकेंद्र ताेमरने पुुरुषांच्या लाइटवेट क्वाडरपल स्कल्स रेपचेजच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या संघाने ६:१५:२६ सेंकदांत स्पर्धा पूर्ण केली.

अमरज्याेत, संजुक्ता, लक्ष्मी चमकल्या : भारतीय महिला संघाकडून अमरज्याेत काैर, डुंग डुंग संजुक्ता, लक्ष्मी देवी आणि नवनीत काैरने चमकदार कामगरिीसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

वुशू : सनातोई देवी, नरेंद्र ग्रेवालला कांस्य
भारतीय संघाने एिशयाडच्या वुशू खेळात मंगळवारी दोन कांस्यपदके िजंकली. भारताकडून सनातोई देवी आणि नरेंद्र ग्रेवाल यांनी ही पदके िजंकली. सनातोई देवीने वुशूच्या ५२ िकलो महिला सांदा गटात हे पदक िजंकले. सेमीफायनलमध्ये सनातोईचा चीनच्या झांग लुआनकडून पराभव झाला. चीनच्या झांगने सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सनातोईवर िनयंत्रण ठेवले. ितने दोन्ही राउंड २-० ने िजंकून सनातोईला हरवले.

जियानकडून नरेंद्रचा पराभव
नरेंद्र ग्रेवालनेसुद्धा वुशूमध्ये पुरुषांच्या ६० िकलो गटात कांस्य िमळवले. सेमीफायनलमध्ये नरेंद्रचा िफलिपाइन्सच्या जियान क्लाड सैकलागकडून २-० ने पराभव झाला. मणिपूरच्या सनातोई आणि ग्रेवाल वुशूमध्ये देशासाठी पदक िजंकणारे ितसरे आणि चौथे खेळाडू ठरले आहेत. यापूर्वी राणी देवी आणि एम. िबमोलजित िसंग यांनी मागच्या आिशयाई क्रीडा स्पर्धेत पदके िजंकली होती.