आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्वॅश : सौरव घोषालला रौप्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय स्क्वॅश स्टार आणि अव्वल मानांकित सौरव घोषालने मंगळवारी एशियाडच्या स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीत रौप्यपदक पटकावले. फायनलमध्ये त्याला कुवेतच्या अब्दुल्लाह अल मुजायेनने २-३ ने हरवले. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर सौरभला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी िदली. सुवर्ण िजंकले नसले तरीही तो स्क्वॅशमध्ये रौप्य िजंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

सौरवची विश्व रँकिंग १६ वी आणि अब्दुल्लाहची ४६ वी आहे. सौरव सुवर्णपदक िजंकेल अशी आशा होती. मात्र, अखेरपर्यंत संघर्ष केल्यानंतरही तो िजंकू शकला नाही. घोषालला एकेरीच्या फायनलमध्ये कुवेतच्या अब्दुल्लाहने ६५ िमनिटे चाललेल्या लढतीत १२-१९, ११-२, १२-१४, ८-११, ९-११ ने हरवले.

सौरवची चांगली सुरुवात
सौरवने फायनलमध्ये पहिला आणि दुसरा गेम अनुक्रमे १२-१० आणि ११-२ ने िजंकत सकारात्मक सुरुवात केली. यानंतर विरोधी खेळाडूने पुनरागमन करताना ितसरा आणि चौथा गेम अनुक्रमे १४-१२, ११-८ असा िजंकला. पाचव्या गेममध्ये घोषालचा १७ मिनिटांत ११-९ ने पराभव झाला.