आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधूची चमकदार कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी इंचियोन एशियन गेम्सच्या पाचव्या दिवशी बुधवारी शानदार कामगिरी करताना बॅडमिंटनच्या महिला एकेरीत आपापले सामने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायनाने मकाऊच्या यू तेंग लोकला अवघ्या २६ मिनिटांत २१-१०, २१-८ ने पराभूत केले.
सायनाने संपूर्ण सामन्यात विरोधी खेळाडूवर पकड कायम ठेवत सामना जिंकला. तिने दोन्ही गेम प्रत्येकी १३ मिनिटांत जिंकले. विश्व चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेत्या पी.व्ही.सिंधूने महिला एकेरीच्या राउंड ऑफ ३२ मध्ये मकाऊच्या वोंग किट लेगला अवघ्या १९ मिनिटांत २-० ने पराभूत करून राउंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला.

दुहेरीतही यश
बॅडमिंटनच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी यांनी नेपाळच्या सिच्चया श्रेष्ठा आणि पूनम गुरंग यांना अवघ्या १६ मिनिटांत २१-६, २१-४ ने पराभूत केले. सुमीत रेड्डी आणि मनू अत्री यांनी मालदीवचे नशिहू शराफुद्दीन आणि मो. सरीम यांना २१-७, २१-७ ने पराभूत केले.
छायाचित्र- सायना आणि सिंधू