आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांकडून निराशा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष नेमबाजी संघाचे कांस्यपदक बुधवारी थोड्या फरकाने हुकले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला चौथ्या, तर ५० मीटर रायफल प्रोन सांघिक स्पर्धेत महिला संघाला अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला नेमबाजांनी वैयक्तिक प्रकारातही निराशाजनक कामगिरी केली.

स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सांघिक गटात राज चौधरी, लज्जा गोस्वामी आणि तेजस्विनी मुळे यांनी ५० मीटर रायफल प्रोनमध्ये निराशाजनक कामगिरी केली आणि तळातील ११ वे स्थान गाठले. वैयक्तिक नेमबाजीतही भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशाच होती.

पुरुषांचे कांस्य हुकले : पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत हरप्रीत सिंग, गुरप्रीत सिंग आणि पेंबा तेमांग यांचा संघ १७०४ - ३९ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. यात भारतीय संघाचे कांस्यपदक अगदी थोडक्यात हुकले. व्हिएतनामच्या तान्ह मिन्ह हा, तू थान कियू आणि नाम क्वांग बुई यांच्या संघाने कांस्य जिंकले.

तेजस्विनी मुळे ३६ व्या स्थानी
महिलांच्या एकेरीच्या ५० मीटर रायफल प्रोनच्या फायनलमध्येसुद्धा भारतीय खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले. औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिचे या प्रकारात ३६ वे स्थान राहिले. या प्रकारात राज चौधरी २२ व्या आणि लज्जा गोस्वामी २५ व्या स्थानावर राहिली.