आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games 2014 News In Marathi, Divya Marathi, Dushyant Chauhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नौकानयनमध्ये दुष्यंतला कांस्य, रोइंग प्रकारात भारताला पहिल्यांदा मिळाले पदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारताच्या दुष्यंत चौहानने इंचियोन एशियन गेम्समध्ये शानदार कामगिरी करताना नौकानयनमध्ये (रोइंग) पुरुषांच्या लाइट वेट एकेरी स्क्ल्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. दुष्यंतने ७.२६.५७ सेकंदाचा वेळ घेत २००० मीटरचे अंतर पार करीत कांस्यपदक आपल्या नावे केले. यजमान दक्षणि कोरियाच्या ली हकबिओमने ७.२५.९५ सेकंदाच्या वेळेसह रौप्य आणि हाँगकाँगच्या लोक वान होईने ७.२५.०४ सेकंदाससह सुवर्णपदक जिंकले. एशियाडच्या रोइंग खेळ प्रकारात भारताचे हे आतापर्यंतचे पहिलेच पदक ठरले आहे.

२१ वर्षीय दुष्यंत चौहानने शानदार सुरुवात केली. रेस सुरू झाल्याच्या काही वेळानंतरच तो दुस-याक्रमांकावर आला. यानंतर त्याने आघाडीसुद्धा घेतली. एक वेळ तर दुष्यंत इतिहास घडवून सुवर्णपदक जिंकेल, असे वाटत होते. मात्र, हाँगकाँगच्या वॉन होईने दुष्यंतला १००० मीटरनंतर मागे टाकले. नंतर यजमान संघाचा खेळाडूसुद्धा दुस-याक्रमांकावर पोहोचला.

महिला पाचव्या स्थानी
दुसरीकडे भारतीय महिला नौकानयनपटूंनी निराशाजनक कामगिरी केली. महिलांच्या दुहेरी स्पर्धेत भारताची डुंग डुंग संजुक्ता आणि तिची जोडीदार तरुनिखा प्रतापने ८.२८.१३ सेकंदाचा वेळ घेत २००० मीटरमध्ये पाचवे स्थान पटकावले. या स्पर्धेत दक्षणि कोरियाच्या जिओन सिओयेओंग आणि किम सिओहीने रौप्य तर चीनच्या झांग मिन आणि मिआओ तिआनने सुवर्ण जिंकले.
टेनिस, स्क्वॅश, बॉक्सिंगमध्ये यश
टेनिस : भारताने पाकिस्तानला हरवले
भारताने टेनिसच्या महिला दुहेरीतील पहिल्या लढतीतच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-० ने पराभूत करून शानदार सुरुवात केली. भारताची श्वेता चौधरी आणि रिशिका सुनहारा यांनी पाकिस्तानची सारा मन्सूर आणि उश्ना सुहेल या जोडीला अवघ्या ५७ मिनिटांत पराभूत केले. भारतीय खेळाडूंनी या लढतीत ६-४, ६-० ने विजय मिळवला. एकेरीत नताशाचा पराभव झाला.

स्क्वॅशमध्ये महिला खेळाडू चमकल्या
दीपिका पल्लिकल, जोश्ना चिनप्पा आणि अनाका अलंकामोनी या त्रिकुटाने स्क्वॅशमध्ये महिला सांघिक स्पर्धेत हाँगकाँगला २-१ ने हरवले. दीपिका पल्लिकलने सुरुवात केली. मात्र, तिला हाँगकाँगच्या ए.यू.विग ची एनीने २-३ ने हरवले. दुस-याएकेरीत जोश्ना चिनप्पाने चान हो लीगला ३-२ ने पराभूत केले. अनाका अलंकामोनीने अखेरच्या लढतीत भारताला विजय मिळवून दिला.

बॉक्सिंग : अखिल, थापा प्रीक्वार्टरमध्ये
बॉक्सिंगमध्ये माजी चॅम्पियन अखिलकुमार, शिवा थापा यांनी प्रीक्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणा-या अखिलने नेपाळच्या पूर्ण बहाद्दूर लामाला पुरुषांच्या ६० किलो लाइट वेट गटाच्या पहिल्या फेरीत पराभूत केले. अखिलने सहज बाजी मारली. दुसरीकडे शिवा थापाला तिमोर ल्युस्टेचा लियोनल परादा हेलोकडून पुढे चाल मिळाली.