(फोटो – सुवर्णपदक जिंकल्यानंतर मेरी कोम)
इंचियोन – 17 व्या आशियाई स्पर्धेमध्ये बॉक्सिंग प्रकारात सुवर्ण पदक जिंकून मेरी कोमने इतिहास रचला आहे. तिने महिला फ्लायवेट गटामध्ये सुवर्णपदकाची कामगिरी केली. मेरी कोमने कझाकिस्तानच्या झैना शेकेरबेकोवाला 2-0 अशा फरकाने पराभूत केले. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि आयोजकांनी केलेल्या भेदभावामुळे सरीतादेवीने पदक नाकारले.
मेरी कोमने चार पैकी दोन राउंडमध्ये परफेक्ट 30 चा स्कोअर तयार केला होता. पहिल्या राउंडमध्ये कझाकिस्तानची झैना वरचढ राहिली. दुस-या राउंडमध्ये मेरीकोमने आघाडी घेत जोरदार ठोशे लगावत 29-28 अशी आघाडी घेतली.
आपला अनुभव पणाला लावत मेरी कोमने तिस-या आणि चौथ्या फेरीमध्ये झैनाला धुळ चारली.
सरीताने पदक नाकारले
मेरी कोमने सुवर्ण पदक मिळविले खरे परंतु त्याच वेळी सरीतादेवीने कांस्य पदक नाकारले. सरीता देवीने गुणदानातील भेदभावाबद्दल इंडियन ऑलिम्पिक असोसिएशकडे मागणी केली परंतु असोसिएशने हात वर केले. सरीताने पत्रकार आणि काही खेळाडूंच्या मदतीने 500 डॉलर अपीलसाठी जमा केले. परंतु तिची अपीलची मागणी आयोजकांनी धुडकावून लावली. त्यामुळे सरीताने पदक नाकारले व ती रडतच पोडियम सोडून गेली.
महिला हॉकी संघाला कांस्य
भारतीय महिला हॉकी संघाने कांस्य पदकाच्या फेरीत जपानला 2-1 अशा फरकाने हरविले. भारताकडून जसप्रीत कौरने 23 व्या मिनिटाला गोल करुन आघाडी घेतली होती. त्यानंतर 41 व्या मिनिटाला जपानच्या शिबाते अकानेने फील्ड गोल करुन सामन्यात बरोबरी साधली. सामना अधिक रंजक होत असतानाच भारताच्या वंदना कटारियाने दुसरा निर्णायक गोल करत भारताला विजय मिळवून दिला.
भारताचे पदक तालिकेतील स्थान
रॅंक सुवर्ण रौप्य कांन्स एकूण
10 7 8 33 48
पुढील स्लाइडवर पाहा, सुवर्णपदक विजेते खेळाडू