आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japanese Swimmer Banned For Charges Of Camera Theft In Incheon

ASIAD: जपानच्‍या सुवर्णपदक विजेत्‍या जलतरणपटूने केली चोरी, लागला प्रतिबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जलतरणपटू नाओया टोमिटा - फाइल फोटो)
टोकियो - इंचियोन एशियन गेम्स मध्‍ये जपानचा सुवर्णपदक विजेता जलतरणपटू नाओया टोमिटावर कॅमेरा चोरीचा आरोप सिध्‍द झाला आहे. त्‍यामुळे जपान जलतरणपटू संघाने त्‍याच्‍यावर 18 महिन्‍यांचा प्रतिबंध लावला आहे. टोमिटाला फेडरेशनने 31 मार्च 2016 पर्यंत त्‍यांच्‍यावर स्‍पर्धेमध्‍ये खेळण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे.
टोमिटाने 2010 मध्‍ये झालेल्‍या ग्वांगझू एशियन गेम्समध्‍येसुध्‍दा सुवर्णपदक जिंकले होते. टोमिटावर जपान जलतरण संघटनेने बंदी घातल्‍यानंतर टोमिटाच्‍या सर्व प्रायोजक, स्पोर्ट्स वीयर कंपनींसोबतचा करारही 18 महिने स्‍थगित राहणार आहे.

टोमिटावर दक्षिण कोरियाच्‍या एक न्‍यूज एजन्‍सीच्‍या छायाचित्रकाराचा 7600 डॉलरचा कॅमेरा चोरीचा आरोप होता. टोमिटाने आपला गुन्‍हा कबुल केला आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, आतापर्यंत कोणत्‍या खेळाडूंवर झाले चोरीचे आरोप...