आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games: India Got Fourth Medal In Shooting, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धा : भारतीय नेमबाजांनी 25 मीटर पिस्‍टल प्रकारात मिळविले सांघिक कास्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय खेळाडूंनी 17 व्या आशियाई स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवताना भारतासाठी पुन्‍हा एका कांस्यपदकांची कमाई केली. या पदकासह भारताची पदकसंख्‍या पाच झाली आहे.

25 मीटर पिस्‍टल टीम प्रकारात आज भारतीय महिला नेमबाजांनी कास्‍यपदकाचा वेध घेतला. भारताच्‍या झोळीत आतापर्यंत 1 सुवर्ण 4 कास्य पदकांचा समावेश आहे.
हीना सिध्‍दु, राही सरनोबत आणि अनिसा सय्यद यांनी 1729 गुणांची कमाई करत भारताला कास्‍य पदक मिळवून दिले.
सरनोबतने 580, अनीसाने 577 आणि हीनाने 572 गुणांची कामगिरी केली.
यजमानांनी सुवर्ण कामगिरी
यजमान दक्षिण कोरिया संघाने 1748 गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावले. तर चीनने 1748 गुणांची कमाई करत रौप्‍य पदक पटकाविले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, कास्‍यपदक मिळवून देणा-या नेमबाजांची छायाचित्रे..