इंचियोन - 17 व्या आशियाई स्पर्धेच्या सातव्या दिनी भारतीय नेमबाजांनी रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तूल सांघिक प्राकरात भारतीय अॅथलेटपटू दुस-या स्थानी आहेत. पेंगा तमंग, गुरुप्रीत सिंह आणि विजय कुमार यांनी रौप्य कामगिरी केली आहे.या पदकासह भारताच्या झोळीत एकूण 16 पदके झाले आहेत.
बॅडमिंटन - पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पी. कश्यप पराभूत झाला आहे.
सेलिंग
महिलांच्या डबल टीम इव्हेंटमध्ये भारताची वर्षा गौतम आणि एन. एश्वर्या यांनी पहिल्या रेसमध्ये दुसरे स्थान मिळविले. त्यांच्याकडून पदकाची आशा आहे.
पुरुष ऑप्टिमिस्ट सिंगल्स - चित्रेश ताथा सहाव्या स्थानी राहिला.
भारताची पदक तालिका
रँक | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण |
16 | 1 | 2 | 13 | 16 |