आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मल्लांवर पदकांच्या आशेचा भार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियातील इंचियोन येथे १७ व्या आशियाई स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे आता केवळ सात दिवस उरले आहेत. स्पर्धेत ५१६ खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. कुस्ती, नेमबाजी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स आणि हॉकी खेळ प्रकारात भारताचे स्टार खेळाडू पदकाच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहेत. कुस्तीतील भारतीय दावेदारीवर ही माहिती...!

२० सुवर्णांसाठी झुंज
कुस्तीत २० सुवर्णपदकांसाठी झुंज रंगणार आहे. यात भारताचे १८ मल्ल नशीब आजमावणार आहेत. यातील अमित,
योगेश्वर, बजरंग, पवन, सत्यवर्त, बबिता, विनेश, गीतिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकली.

इराणचे तगडे आव्हान
भारतीय मल्लांना स्पर्धेत इराण आणि जपानच्या खेळाडूंचे तगडे आव्हान असेल. या दोन्ही देशांचे संघ प्रत्येकी तीन वेळा आणि दक्षिण कोरिया व चीनचे संघ प्रत्येकी दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन्स राहिले आहेत.

सहा ते सात पदकांची आशा
कुस्तीत आपल्याला सहा ते सात पदकांची आशा आहे. ग्वांगझू आशियाई स्पर्धेत (२०१०) भारताने तीन पदके जिंकली होती, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली.