आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई स्पर्धेत भारताचे ७५ पदकांचे लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काही खेळाडूंनी माघार घेतलेली असतानाही भारतीय पथकाच्या व्यवस्थापनाने आशियाई स्पर्धेत भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच भारताला या स्पर्धेत किमान ७० ते ७५ पदके मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. स्पोर्ट््स अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे महासंचालक जीजी थॉम्पसन यांनी भारताकडून ७५ पदकांची अपेक्षा बाळगणे रास्त असल्याचे मत व्यक्त केले. ग्वांगझू येथे २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत ६५ पदकांची कमाई केली होती. यंदा भारताच्या काही नामवंत खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव आशियाई दौऱ्यातून माघार घेतल्याने फटका बसू शकतो.
टेनिसची पदके घटणार
सोमदेव देववर्मनने प्रारंभीच आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पेस आणि बोपन्नानेदेखील माघार घेतल्याने भारताच्या टेनिसमधील पदकांच्या संख्येत निश्चितच घट होणार आहे. तसेच भारतीय संघ क्रिकेटमध्येही सहभागी होणार नसल्याने ते पदकदेखील हुकण्याची शक्यता आहे. तसेच बुद्धिबळ आणि रोलर स्पोर्ट्सदेखील या स्पर्धेतून वगळण्यात आल्याने भारताची या प्रकारातील पदकेदेखील कमी होणार आहेत.