आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकीत १६ वर्षांनंतर पदकाची आशा, पाकशी २५ रोजी सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने प्रदीर्घ काळापासून हॉकीत मोठे विजेतेपद जिंकलेले नाही. मात्र, ही प्रतीक्षा आता इंचियोन आशियाई स्पर्धेत संपू शकते. यंदा भारतीय हॉकी संघ १६ वर्षांनंतर एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून परतेल, अशी आशा आहे. यापूर्वी १९९८ मध्ये सुवर्ण जिंकले होते.

ग्लासगो रौप्यमुळे वाढली आशा
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने हॉकीत रौप्यपदक जिंकले होते. क्रमवारीत गतविजेता द. कोरियापेक्षा (८) भारत एका स्थानाने मागे आहे. पािकस्तानसुद्धा (११) भारताच्या जवळ आहे. मात्र, गेल्या वर्षभरात भारताने या दोन्ही संघांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषकात भारत नवव्या तर कोरिया अकराव्या स्थानी होते.
पाकशी २५ रोजी सामना
भारत, पाकिस्तान, चीन, ओमान, श्रीलंका ब गटात आहे. यातील अव्वल दोन संघ सेमीफायनल खेळतील. पाकसोबत २५ रोजी सामना आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य जिंकल्याने आत्मविश्वास बळावला आहे. एशियन गेम्समध्ये सुवर्ण जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- टेरी वॉल्श, भारतीय पुरुष संघाचे कोच.
यांच्यावर असेल मदार
सरदारासिंग, श्रीजेश, मनप्रीत, गुरबाज, आकाशदीप, रमणदीप, रघुनाथ आणि रूपिंदर पाल.
महिला संघाला चीनचे आव्हान
महिला गटात भारताचा मार्ग खडतर आहे. विशेषत: चीनचे मोठे आव्हान भारताला असेल. चीन मागच्या तीन एशियन गेम्समध्ये (२००२, २००६, २०१०) चॅम्पियन आहे. यजमान कोरिया, जपानचेही मजबूत आव्हान असेल. असे असले तरीही भारतीय कर्णधार रितू राणीला विजयाचा विश्वास आहे. "आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत. आम्ही सुवर्ण जिंकून परतू,' असे तिने म्हटले.
17 पदके (३ सुवर्ण) भारताने आतापर्यंत दोन्ही गटांच्या हॉकीत मिळून जिंकली आहेत.
1982 च्या एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा महिला हॉकीचा समावेश झाला.