आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17वे आशियाई स्पर्धा: स्क्वॅशमध्ये सुवर्णाची आशा; बॅडमिंटनमध्ये मार्ग कठीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एशियन गेम्स काउंटडाऊनमध्ये आता स्क्वॅश, बॅडमिंटन अणि टेनिसची माहिती. स्क्वॅशमध्ये आपण प्रथमच सुवर्णपदकाचे दावेदार आहोत. तेसुद्धा किमान २ सुवर्ण. बॅडमिंटनमध्ये २ पदकांची आशा आहे. मात्र, यात आपण १ पदक िजंकले तरीही मागच्या तुलनेतच चांगलीच कामगिरी ठरेल. टेनिसमध्ये दोन पदके िमळू शकतात.

सौरव, दीपिकावर असतील नजरा
स्क्वॅशमध्ये ४ सुवर्णांसह एकूण १६ पदकांचे दावेदार. यात आपले ८ खेळाडू लढतील. यात सामील असलेल्या खेळाडूंत सौरव घोषाल नंबर वन आहे. दीपिका पल्लिकल आणि जोशना चनिप्पा आशियातील टॉप-५ च्या खेळाडू आहेत.

दीपिका
मलेशियाचे आव्हान
मलेशिया मजबूत संघ. आिशयाईतील टॉप दोन महिला खेळाडू निकोल डेव्हिड, लो वी वेर्न मलेशियाच्या आहेत.
याशिवाय पाकचेही आव्हान असेल.
६ पदके (३ सुवर्ण) मलेशियाने २०१० च्या एिशयन गेम्समध्ये िजंकली होती. भारताने ३ कांस्य िजंकली होती.

िसंधू-सायनासमोर चीनची िभंत
१० पदके (५ सुवर्ण) चीनने मागच्या स्पर्धेत िजंकली होती.
बॅडमिंटनमध्ये ७ सुवर्णांसह एकूण २८ पदकांची दावेदारी आहे. मागच्या वेळीसुद्धा इतकीच पदके होती. मात्र, भारताला एकही िमळाले नाही. यंदा भारताला पी.व्ही. सिंधू, सायना आणि कश्यपकडून पदकाची आशा आहे.
आपल्यापेक्षा अिधक क्रमवारीच्या चीन, कोरियन खेळाडूंना हरवले तरच यांना पदक िमळू शकेल.

सानियावर असेल मदार
टेनिसमध्ये ७ सुवर्णांसह एकूा २८ पदकांची दावेदारी आहे. भारताने मागच्या वेळी ५ पदके िजंकली होती. या
वेळी अशी शक्यता नाही. कारण संघात एकमेव स्टार खेळाडू सानिया मिर्झा आहे. िलएंडर पेस, बोपन्ना,
सोमदेव आिशयाई स्पर्धेत खेळणार नाही. आता भारताची मदार सानियावर असेल.
०२ सुवर्णपदके मागच्या गेम्समध्ये भारताच्या सोमदेवने िजंकली होती.