आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताला यंदा ७० पदकांची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत ६७९ सदस्यीय पथकासह जात आहे. यात तब्बल ५१६ खेळाडूंचा समावेश असून, हे खेळाडू २८ विविध क्रीडा प्रकारात सहभागी होतील. भारताला या वेळी नेमबाजी, कबड्डी, बॉिक्संग, कुस्ती, स्क्वॅश, टेनिस, वुशू, अॅथलेिटक्स, तिरंदाजी, बॅडमिंटन, गोल्फ, रोईंग आणि याचिंगमध्ये पदकाची आशा आहे. या वेळी ७० पेक्षा अिधक पदके िमळवण्याची दाट शक्यता आहे. १९५१ च्या आिशयाई स्पर्धेतील १५ सुवर्ण िजंकण्याचा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत यंदा भारतीय खेळाडू आहेत.

भारताने १९५१ मध्ये पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते. त्या वेळी स्पर्धा िदल्लीत झाली. त्या स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्यपदकासह एकूण ५१ पदके िजंकून दुसरे थान िमळवले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यंदा चित्र बदलू शकते.
दिल्लीत १३ सुवर्ण भारताने यापूर्वी १९८२ मध्ये आपल्याच यजमानपदाखाली िदल्लीत झालेल्या आिशयाई क्रीडा स्पर्धेत १३ सुवर्ण, १९ रौप्य आणि २५ कांस्यपदकांसह एकूण ५७ पदके िजंकली होती. ग्वांगझू स्पर्धेपूर्वी एकूण पदकांच्या िहशेबाने भारताची १९८२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी झाली होती. भारताने ही कामगिरी २०१० मध्ये मागे टाकली.

दक्षिण कोरिया भारतासाठी फलदायी
दक्षिण कोरिया भारतासाठी नेहमी फलदायी ठरले आहे. द. कोिरयाने पहिल्यांदा १९८६ मध्ये सोल येथे आिशयाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते. त्या स्पर्धेत भारताने ५ सुवर्ण, ९ रौप्य आणि २३ कांस्यपदकासह एकूण ३७ पदके िजंकली होती. द. कोरियाने दुसऱ्यांदा बुसान येथे २००२ मध्ये पुन्हा आ िशयाई स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले होते. त्या वेळी भारताची पदकसंख्या १९८२ च्या नंतर वाढली. बुसान येथे भारताने ११ सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण ३६ पदके िजंकली. सेउल येथे ५ सुवर्ण भारताच्या नावे होते. मात्र, बुसान येथे सुवर्णपदकांची संख्या ११ झाली. आता १७ वी आशियाई क्रीडा स्पर्धा
भारतासाठी फलदायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यंदाची स्पर्धा इंचियोन शहरात आहे. येथे भारत ग्वांगझूची कामगिरी मागे टाकण्यासाठी प्रयत्न करेल.
या वेळी ७० पदकांची आशा
भारतीय खेळाडू इंचियोन येथे िकमान ७० पदके िजंकतील, अशी आशा भारतीय क्रीडा प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. या आकडेवारीत सुवर्ण िकती असतील, याचा अंदाज नाही. मात्र, ज्याप्रमाणे भारतीय खेळाडूंनी २०१० ची िदल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि नंतर ग्वांगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली, ते बघून इंचियोन येथे नवा इितहास लिहिल्या जाईल, असा अंदाज आहे.