आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वे आशियाई स्पर्धा: तिरंदाज व पदकांदरम्यान द. कोरियाचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिरंदाजी खेळात भारतीय खेळाडूंच्या निशाण्यावर यजमान कोरियाचे आव्हान असेल. "दीपिका ब्रिगेड' ने नुकतीच जागतिक चॅम्पियनशिप जिंकली आहे. मात्र, इंचियोनमध्ये त्यांना कोरियाई खेळाडूंचा सामना करावा लागेल. आशिया खंडात कोरियाचा संघच क्रमवारीत भारताच्या पुढे आहे. शिवाय, त्यांच्याच देशात स्पर्धा होणार आहे.

म्हणूनच पदकाची अपेक्षा
स्पर्धेत भारताचे १६ तिरंदाज खेळणार आहेत. यापैकी ७ जागतिक व मागच्या आशियाई स्पर्धेतही खेळले असून त्यांच्यापैकी अनेक जगातील टॉप-१० खेळाडूंत सामील आहेत. दीपिका कुमारी तर अव्वल होती. आिशयाई स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वेळी आम्ही किमान ४ पदके जिंकू, असे प्रशिक्षक धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

दावेदार
दीपिका कुमारी, बोम्बाल्या देवी, लक्ष्मीराणी माझी, प्रणिता वर्धवाणी, तरुणदीप रॉय, जयंत तालुकदार, रजत चौहान, राहुल बॅनर्जी, अतनू दास
यांचे आव्हान दक्षिण कोरिया, जापान, चीन, तैवान, उत्तर कोरिया.

८ सुवर्णांसह २४ पदके यंदा तिरंदाजी स्पर्धेसाठी असतील. मागच्या वेळी ४ सुवर्णपदके होती.
४ सुवर्णपदके (सर्व) मागच्या वेळी द. कोरियाने जिंकले होती. भारताला ३ पदके मिळाली होती.
५ व्या स्थानावर भारत ६ पैकी ३ गटांच्या जागतिक क्रमवारीत. एकातच टॉप-१० च्या बाहेर.

वेटलिफ्टिंगमध्ये पहिल्या सुवर्णाचा शोध
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी शानदार प्रदर्शन करत १४ पदके जिंकली होती. आशियाई स्पर्धेत १५ सुवर्णांसाठी सामना असेल. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही सुवर्णपदक जिंकले नाही. गतवेळी तर एकही पदक जिंकले नव्हते. त्यामुळे यंदा हा दुष्काळ संपवण्याचे आव्हान वेटलिफ्टर्ससमोर असणार आहे. सुवर्ण जिंकल्यास निश्चितच मान उंचावेल.