आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धा उद्यापासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियातील इंचियोनमध्ये शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता आशियाई क्रीडा स्पर्धेेचे उद्‌घाटन होईल. १६ दिवसांपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत ४५ देशांचे १० हजार खेळाडू भाग घेत आहेत. २०१६च्या रिअो ऑलिम्पिकपूर्वी हाेणारे हे सर्वात मोठे क्रीडा आयोजन आहे.
१९ सप्टेंबरपासून ते
4 ऑक्टोबरपर्यंत
खेळ 36
प्रकार 439
28 खेळांत भारत
६३ वर्षे आणि भारत
भारताची टॉप ३ कामगिरी
वर्ष सुवर्ण एकूण पदके
1951 1५ 51
2010 14 65
1982 13 57
भारत एशियाड इतिहासात १२८ सुवर्ण, ५४५ पदकांसह ५ व्या क्रमांकावर आहे.चीन ११९१ सुवर्णांसह प्रथमस्थानी आहे.
१६ पदके जिंकल्यास भारत ६३ वर्षे जुना विक्रम मोडेल
भारताला कुठे कसे आव्हान?
* चीन: नेमबाजी, बॅडमिंटन व अॅथलेटिक्समध्ये चीनचे वर्चस्व. त्यांच्याकडे ५००, तर आपल्याकडे २७० पदके.
*द. कोरिया: तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॉक्सिंगमध्ये नेहमी आपल्या पुढे. या खेळांत त्यंानी आजवर ३५० पदके जिंकली.
*इराण : आपल्याला कुस्तीत सर्वाधिक पदकांची आशा आहे. मात्र या खेळात इराणचा पूर्वीपासूनच दबदबा आहे.
भारत कुठे कुणासाठी आव्हान?
*हॉकी: राष्ट्रकुलमध्ये रौप्य जिंकल्याने संघात उत्साह. पाक व यजमान द.कोरियासाठी भारत ठरू शकतो आव्हान.
*कुस्ती: गेल्या राष्ट्रकुलमध्ये भारताने १३ पदके जिंकली. जपान, इराण, कोरियाला आपले आव्हान.
*कबड्डी : आपण सात वेळा जेतेपद मिळवले आहे. पाक-बांगलादेशाला आव्हान.
१६ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णाची आशा.
जेतेपद मिळाल्यास भारत आगामी रिअो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल.
२८ वर्षांनी कुस्तीत सुवर्ण जिंकण्याची आशा आहे.
२८ वर्षांपासून बॅडमिंटनचे पदक जिंकलेेले नाही. शेवटच्या वेळेस १९८६ मध्ये कांस्यपदक.
भारताचे हे खेळाडू जोरदार फॉर्मात मेरी कोम (बॉक्सिंग), सायना, सिंधू (बॅडमिंटन), सािनया (टेनिस), विकास गौडा (अॅथलेटिक्स), जितू राय (नेमबाजी), योगेश्वर दत्त (कुस्ती).
"मेरी कोम' िचत्रपटाचे गाणे स्पर्धेत भारताचे थीम साँग
मुश्किल वक्त में भी ना हम खोएं हौसला
मिलके साथ चलना हो यूं कर लें फैसला
मिट्टी हम जो चूमें तो मिलता जोश है
बस तेरी ही खातिर जान ये सरफरोश है
जीत का जश्न हम मनाएंगे....
मेरी काेम चित्रपटातील हे गाणे स्पर्धेसाठी भारताचे थीम साँग म्हणून निवडले आहे.
679 सदस्यांचे पथक असेल भारताचे