आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्पर्धा: राही, अनिसा, हिनाच्या त्रिकुटाने मिळवले कांस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय नेमबाजी राही सरनोबत, अनिसा सय्यद आणि हिना सिद्धू या तिघींनी इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिस-या दिवशी सोमवारी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल टीम स्पर्धेत शानदार कामगिरी करताना कांस्यपदक जिंकले. नेमबाजी स्पर्धेत भारताचे हे चौथे पदक ठरले. आतापर्यंत भारताने या स्पर्धेतील नेमबाजी प्रकारात एक सुवर्णासह तीन कांस्यपदके जिंकली आहेत. नेमबाजील एकेरीच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना सोमवारी चमकदार प्रदर्शन करता आले नाही.

राही सरनोबत, अनिसा सय्यद आणि हिनाच्या टीमने एकूण १७२९ गुणांची कमाई केली. चीनने १७४७ गुणांसह रौप्यपदक, तर यजमान दक्षिण कोरियाने १७४८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
राही सातव्या क्रमांकावर
राहीने आठवे स्थान िमळवताना २५ मीटर िपस्तूल स्पर्धेत महिलांच्या एकेरीच्या फायनल्समध्ये प्रवेश केला. तिने २८९ आिण रॅपिड इव्हेंटमध्ये २९१ गुण िमळवले. ितला ही कामगिरी पुढे कायम राखता आली नाही. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सातवे स्थान िमळाल्यानंतर ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाली.
हिना, अनिसा अपयशी : इतर भारतीय नेमबाज हिना िसद्धू आिण अनिसा सय्यद यांना २५ मीटर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारात अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. या दोघींना फायनल्ससाठी क्वािलफाय करण्यात अपयश आले. िहनाने ५७२ गुणांसह १७ वे, तर अिनसाने ५७७ गुणांसह १० वे स्थान िमळवले. यासह दोघी फायनलच्या शर्यतीतून बाहेर झाल्या.

सांघिक स्पर्धेत ित्रकुटाचे अपयश
महिलांच्या १० मीटर एअर रायफल टीम स्पर्धेतील फायनल्समध्ये भारतीय नेमबाजांना पदक िजंकता आले नाही. अयोनिका पॉल, अपूर्वी, चंदेला आिण राज चौधरी यांच्या संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. अयोनिकाने ४१७.७, चंदेलाने ४१३.८ आिण राजने ४०७.६ चा स्कोअर केला. भारतीय संघाचा एकूण स्कोअर १२३९.१ असा रािहला. महिलांच्या १० मीटर टीम स्पर्धेत चीनने सर्वािधक १२५३.८ गुणांसह अव्वलस्थान िमळवत सुवर्ण िजंकले. इराणने दुसरे स्थान िमळवले.

वुशूमध्ये पदक निश्चित
युवा खेळाडू नरेंद्र ग्रेवालने आशियाई स्पर्धेत भारताचे एक पदक निश्चित केले. त्याने साेमवारी चमकदार कामगिरी करताना वुशू या खेळ प्रकाराच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या खेळाडूने उपांत्यपूर्व लढतीत पाकिस्तानच्या अब्दुल्लाचा पराभव केला. यासह त्याने अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला. यासह त्याने वुशू खेळ प्रकारात भारताला पदक मिळवून देण्याचे स्वप्नही साकारले. या स्पर्धेतील वुशू या खेळप्रकारात भारताचे हे पहिलेच पदक ठरले आहे.

अभिनवचा शेवटचा नेम!
ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्रा आशियाई स्पर्धेत मंगळवारी १० मीटर एअर रायफल्स प्रकारात शेवटचा नेम साधणार आहे. अशा प्रकारचे व्टिट त्याने साेमवारी केले. यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान,ही त्याने अशाप्रकारची घाेषणा केली हाेती. आता आपण आगामी रियाे २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत असल्याचेही त्याने सांगितले.