आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिस-या दिवशीही भारताला सुवर्ण पदकाची हुलकावणी;नेमबाजी, स्क्वॅश, वुशूमध्ये कांस्यपदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी भारताच्या नावे चार पदके निश्चित झाली. नेमबाजीत महिला गटात (राही सरनोबत, अनिसा सय्यद, हिना सिद्धू) कांस्य, वुशूमध्ये (नरेंद्र ग्रेवाल) कांस्य आणि स्क्वॅशमध्ये कांस्य (दीपिका पल्लिकल) मिळाल्यानंतर सौरभ घोषालने आणखी एक पदक निश्चित केले. तिस-या दिवशीसुद्धा भारताला सुवर्णाने हुलकावणी दिली.

भारताची युवा स्टार खेळाडू दीपिका पल्लिकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. पुरुष गटात भारताच्या सौरभ घोषालने फायनलमध्ये पोहोचून सुवर्ण किंवा रौप्यपैकी एक पदक निश्चित केले.

सेमीफायनलमध्ये मलेशियाच्या डेव्हिड निकोलने भारताच्या दीपिकाला ३-० ने पराभूत केले. यामुळे दीपिकाला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारताने एशियाडमध्ये पहिल्यांदा महिला वैयक्तिक गटात पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेतील भारताचे हे सहावे पदक ठरले. महिला एकेरीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकाची खेळाडू दीपिका पल्लिकलने थोडासुद्धा संघर्ष केला नाही. डेव्हिड निकोलने दीपिकाला २५ मिनिटांत ११-४, ११-४, ११-६ ने पराभूत केले. दीपिका मलेशियाची खेळाडू निकोलसमोर लयीत दिसली नाही. दीिपकाने पहिला गेम अवघ्या ८ मिनिटांत गमावला. दुस-या आणि तिस-या गेममध्ये तिचा अवघ्या सहा मिनिटांत पराभव झाला.

घोषाल अंतिम फेरीत
पुरुष गटात सौरभ घोषालने शानदार कामगिरी करताना १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीचा सेमीफायनल सामना ३-० ने जिंकला. या विजयासह सौरभने भारतासाठी सुवर्ण िकंवा रौप्य यापैकी एक पदक निश्चित केले. अव्वल मानांकित घोषालने एकेरीच्या सेमीफायनलमध्ये मलेशियाच्या ओंग बंेगला ४५ मिनिटांत सरळ गेममध्ये ११-९, ११-४, ११-५ ने हरवत रौप्यपदक निश्चित केले.
( छायाचित्र : दीपिका पल्लिकल)