आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी : आज भारत-पाक झुंज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारताला एशियाडमध्ये पुन्हा १६ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवून देण्याच्या इराद्याने उतरलेल्या भारतीय संघाचा सामना आज पाकिस्तानशी रंगणार आहे. साखळी सामन्यांमध्ये भारताचा होणारा हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा आणि तितकाच उत्कंठावर्धक राहणार आहे. भारत एशियाडमध्ये दोन वेळा विजेता असून पाकने आतापर्यंत आठ वेळा एशियाडचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे साखळी सामन्यातील ही लढत भारताच्या तयारीचा अंदाज बांधू शकणारी ठरणार आहे.
भारतीय संघ सकारात्मक
भारताने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेला ८-० असे पराभूत केले आहे, तर ओमानचा ७-० असा पराभव केला असल्याने सकारात्मक मानसिकतेत असल्याने भारताच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना सर्वोत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवावे लागणार असून तसेच नियोजन पाकच्या संघाकडून केले जाण्याची शक्यता आहे.